कानडी अभिनेत्री चेतना राजचे २१ व्या वर्षी दुःखद...

कानडी अभिनेत्री चेतना राजचे २१ व्या वर्षी दुःखद निधन (Kannada Tv Actress Chethana Raj Dies At 21 After Fat Free Plastic Surgery)

कानडी अभिनेत्री चेतना राज हिचा वयाच्या २१व्या वर्षीच दुर्दैवी अंत झाला. मिळालेल्या वृत्तानुसार, प्लास्टीक सर्जरीने तिचा प्राण घेतला. चेतनाने एका खासगी हॉस्पिटलमध्ये वजन कमी करण्यासाठी, अर्थात्‌ अंगावरची चरबी कमी करण्यासाठी प्लास्टीक सर्जरी करून घेतली होती. पण त्यामध्ये झालेल्या चुकीमुळे तिचा अंत झाला.

सदर ऑपरेशन केल्यावर चेतनाची फुप्फुसे निकामी झाली. या कारणाने तिचा मृत्यू ओढवला. तिने हे ऑपरेशन आपल्या आई-वडिलांना न कळवता केले होते. पण् आता तिचे हेच पालक , डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप लावत आहेत.

या प्रकरणी असे कळते की, डॉक्टरांच्या चुकीने तिच्या फुप्फुसात पाणी साठले. त्याचे इन्फेक्शन होऊन चेतनाला प्राणास मुकावे लागले. तिच्या पालकांनी सदर खासगी हॉस्पिटल विरुद्ध पोलिसात तक्रार गुदरली आहे. डॉक्टरांच्या बेपर्वाईने आपल्या मुलीला ऐन तारुण्यात जीव गमवावा लागला, असा त्यांचा दावा आहे.