‘खतरों के खिलाडी’ च्या शूटिंगमध्ये स्टंटबाजी कर...

‘खतरों के खिलाडी’ च्या शूटिंगमध्ये स्टंटबाजी करताना कनिका मान जखमी (Kanika Mann Suffer Injuries While Performing A Stunt In ‘Khatron Ke Khiladi 12 ‘)

‘गुड्डन तुमसे ना हो पाएगा ’ या मालिकेची कलाकार कनिका मान दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरात ‘ खतरों के खिलाडी १२ ’  या कार्यक्रमाचे शूटिंग करते आहे . तिथे स्टंटबाजी करताना ती फारच जखमी झाली आहे . तिच्या हातापायांना फारच जखमा झाल्या आहेत. या अवस्थेतील तिचे फोटो सोशल मिडियावर वायरल होत आहेत.

 कनिका मान ‘ खतरों के खिलाड़ी’ ची एक स्पर्धक आहे. त्यामध्ये स्टंटस करताना तिच्या हातापायांना जबरी मार लागला आहे. असं असलं तरी तिचा आत्मविश्वास डगमगलेला नाही .

स्टंट करत असताना मार लागणे हा तर या खेळाचा एक भाग आहे , असे कनिकाने इ – टाइम्सला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितलं आहे . या कार्यक्रमात भाग घ्यायला मिळाला म्हणून ती जाम ख़ुश आहे.  अन् तिनं सगळे स्टंट्स न थांबता पूर्ण केलेत.  अंगावर झालेल्या जखमांचे दागिन्यांप्रमाणे प्रदर्शन करणे तिला आवडत आहे.

 कनिकाने या मुलाखतीत सांगितलं , ” मार लागल्याने मला खूपच वेदना होत आहेत , असं मी रोहित सरांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले की , हे प्रेक्षकांना थोडंच कळणार आहे . तू या खेळात आलीस अन् एक खंबीर खेळाडू आहेस हे लोकांना दाखवून दे.  आपल्याला झालेल्या जखमांचे फोटो काढून कनिकाने  घरच्यांना पाठवले. या जखमांच्या रुपाने मला नवे दागिने आणि ट्रॉफी मिळाली आहे , अशी कनिकाने त्याला जोड दिली. जखमा झाल्या तरी खेळातील माझे सर्व टास्क मी पूर्ण करीन असंही कनिकाने निडरपणे सांगितले आहे .

सोशल मिडियावर कनिकाची ही अवस्था बघून तिचे चाहते काळजी व्यक्त करत आहेत . या ‘ खतरों के खिलाडी १२ ’ कार्यक्रमात कनिका सोबत रुबिना दिलैक, प्रतीक सहजपाल, निशांत भट्ट असे अनेक टी.व्ही. स्टार्स भाग घेत आहेत.