करीना – दीपिका नव्हे; कंगना होणार सीता (K...

करीना – दीपिका नव्हे; कंगना होणार सीता (Kangana Will Play Sita, By Surpassing Kareena And Deepika)

‘सीता- द इनकारनेशन’ या बॉलिवूडच्या बहुप्रतिक्षित चित्रपटामध्ये सीतेचे पात्र साकारण्यासाठी आधीपासून करीना कपूर खान आणि दीपिका पादुकोण या अभिनेत्रींची नावं प्रामुख्याने घेतली जात होती. परंतु, या दोघींनाही मागे टाकत कंगना रणौतने या शर्यतीत बाजी मारली आहे. अलौकिक देसाई निर्मित या बिग बजेट चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी आता अभिनेत्री कंगना रणौतचे नाव नक्की करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

Kangana, Play Sita

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

Kangana, Play Sita

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हटली जाणाऱी कंगना रणौत सध्या तिच्या ‘थलाइवी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. १० सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘थलाइवी’ चित्रपटातील अभिनयासाठी कंगनाची बरीच प्रशंसा होत आहे. दरम्यान सीतेच्या भूमिकेसाठी कंगनाची वर्णी लागणं, हे तिच्या चाहत्यांसाठी मोठं नवलाईचं आहे.

Kangana, Play Sita

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

‘सीता- द इनकारनेशन’ या चित्रपटामध्ये कंगना रणौत दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत दिसेल. याबाबतची माहिती स्वतः कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. अलिकडेच कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करून या बातमीस दुजोरा दिला आहे. कंगनाने आपल्या चाहत्यांना ती ‘सीता- द इनकारनेशन’ या चित्रपटामध्ये सीतेची भूमिका करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Kangana, Play Sita

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

कंगनाने एक फोटो शेअर करून कॅप्शन लिहिलीय – “ ‘सीता- द इनकारनेशन’ या चित्रपटाचा भाग बनल्यानंतर मला खूप छान वाटत आहे. या चित्रपटाच्या प्रतिभावंत टीमसह काम करणे माझ्यासाठी अभिमानाचं आहे आणि हे सर्व सीतेच्या कृपेने शक्य झाले आहे. जय श्री राम.” तिची ही पोस्ट तरी तिच सीता होणार असल्याचे सांगत आहे.

याआधी सीतेच्या भूमिकेसाठी दीपिका पादुकोण आणि करीना कपूर यांची नावं घेतली गेली होती. या भूमिकेसाठी अधिक मानधनाची मागणी केल्यामुळे करीना ट्रोलही झाली होती.

Kangana, Play Sita

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

Kangana, Play Sita

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित ‘थलाइवी’ या चित्रपटामध्ये कंगनाने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अरविंद स्वामीने एमजीआरचे पात्र साकारले आहे. कंगनाने आगामी चित्रपट ‘धाकड’चे शुटिंगही पूर्ण केले आहे. शिवाय लवकरच ती ‘तेजस’ आणि ‘सीता- द इनकारनेशन’ चे शूटिंग सुरू करणार आहे.