कंगणा रणावतने शेअर केला आईचा शेतात काम करतानाचा...

कंगणा रणावतने शेअर केला आईचा शेतात काम करतानाचा फोटो, कंगणाच्या आईच्या साधेपणाने जिंकली चाहत्यांची मने (Kangana shares a photo of her mom working in the farm, Writes- My Mom works in the field for 7-8 hours everyday, Kangana’s Mom’s simplicity wins heart)

बॉलिवूड क्वीन कंगना रणावत चित्रपटांपेक्षा सध्या वेगवेगळे वाद आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ती अनेकदा तिच्या कुटुंबातील सदस्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. कंगणाने नुकतेच आपल्या आईचा फोटो शेअर केला असून तो तिच्या चाहत्यांना फार आवडला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये कंगणाने तिची आई अजूनही 7-8 तास शेतात काम करत असल्याचे सांगितले. ती अजूनही स्वतः पाहुण्यांसाठी चहा आणि जेवण बनवते. कंगनाच्या आईच्या साधेपणावर चाहते फार खुश झाले आहेत.

कंगनाने आपल्या आईचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, त्यामध्ये ती शेतात काम करताना दिसत आहे. फोटो शेअर करताना कंगनाने आईसाठी एक खास नोट लिहिली, “ही माझी आई आहे. ती रोज ७-८ तास शेती करते. अनेकदा लोक घरी येऊन सांगतात की, आम्हाला कंगनाच्या आईला भेटायचे आहे. अत्यंत नम्रतेने हात धुऊन झाल्यावर ती त्यांना चहा-पाणी देते आणि म्हणते, मीच तिची आई आहे, तिला पाहून येणाऱ्यांचे डोळे पाणावतात, त्यांना धक्का बसतो, ते तिच्या पाया पडतात.

कंगनाने पुढे लिहिले- “एकदा मी म्हणाले होते की इतके लोक घरात येतात, मग प्रत्येकासाठी चहा आणि जेवण बनवण्याची काय गरज आहे! ती म्हणाली- नाही बेटा, तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांची आम्ही सेवा करू शकलो हे आमचे भाग्य आहे… धन्य माझी आई आणि तिचे चारित्र्य.

कंगनाने पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की तिची आई सरकारी शाळेत संस्कृत भाषा शिकवायची. तिने पुढे लिहिले की, “फक्त एकच तक्रार आहे, तिला चित्रपटाच्या सेटवर यायचे नसते, बाहेरचे जेवायचे नसते, घरचे जेवणच खाणार, मुंबईत राहायचे नसते, परदेशात जायचे नसते … आणि जर आपण जबरदस्ती केली तर जबरदस्त ओरडा खावा लागतो. आता हिच्या हाताखाली जगाल तरी कसं?”

अभिनेत्रीने बॉलिवूडवरही निशाणा साधला एका ट्विटमध्ये अभिनेत्रीने लिहिले- “कृपया लक्षात घ्या की माझी आई माझ्यामुळे श्रीमंत नाही. मी राजकारणी, नोकरशाही आणि व्यापारी कुटुंबातून आले आहे. आई 25 वर्षांहून अधिक काळ शिक्षिका आहे. माझ्यातला माज कुठून येतो आणि मी वाईट गोष्टी का करत नाही आणि त्यांच्यासारख्या लग्नात डान्स का करत नाही हे चित्रपट माफियांना समजले पाहिजे.

कंगनाच्या आईच्या या साधेपणाच्या लोक प्रेमात पडले आहेत. तिच्या या पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तसेच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.

कंगना लवकरच ‘इमर्जन्सी’ चित्रपटात दिसणार आहे. त्यात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे ‘तेजस’, ‘मणिकर्णिका रिटर्न्स’ ‘सीता’ आणि ‘टिकू वेड्स शेरू’ सारखे चित्रपट आहेत.