कंगना रणावतची स्टार पुत्रांवर टीका; म्हणते, ‘उक...

कंगना रणावतची स्टार पुत्रांवर टीका; म्हणते, ‘उकडलेल्या अंड्यांसारखे दिसतात’ (Kangana Ranawat Takes A Dig At Star Kids, Says – They Look Like Boiled Eggs)

नेहमीच तिरकस शेरे मारून आपल्या अंगावर वाद ओढवून घेणाऱ्या कंगना रणावतने आता पुन्हा नवा वाद निर्माण केला आहे. तिने स्टार पुत्रांवर टीका करत, त्यांना उकडलेल्या अंड्यांची उपमा दिली आहे.

अलीकडेच कंगनाने एका मुलाखतीत दाक्षिणात्य सिनेसृष्टी आणि तिकडच्या स्टार अभिनेत्यांबद्दल आपले मत मांडले. ती म्हणाली की, दक्षिणेकडील सिताऱ्यांच्या तुलनेत बॉलिवूड स्टार्सच्या मुलांची जुळवून घेणे, प्रेक्षकांना जड जाते.
कंगना म्हणाली की, “दाक्षिणात्य सिताऱ्यांचे प्रेक्षकांची जे बंध जुळतात, ते मजबूत असतात. आमच्याकडील स्टार्सची मुले शिक्षणासाठी परदेशात जातात. इंग्रजी बोलतात. फक्त हॉलिवूडचे चित्रपट पाहतात. चाकू आणि काटे यांनी जेवतात. अशा मुलांची प्रेक्षकांची नाळ कशी जुळणार? ही मुले दिसतातही उकडलेल्या अंड्यांसारखी.   त्यांचं रुपडं बदललेलं असल्याने लोक त्यांना आपलंसं मानत नाहीत. मी कुणाला ट्रोल करू इच्छित नाही.”

कंगनाने ‘पुष्पा’ या चित्रपटाची तारीफ केली. आणि त्यातील प्रमुख कलाकार अल्लू अर्जुन याचे उदाहरण देत म्हणाली, “बघा नं पुष्पा कसा ओळखीचा वाटतो. प्रत्येक कामगाराशी त्याचे बंध जुळतात. आमचा कुठला हीरो कामगार वाटतो तरी का? दाक्षिणात्य कलाकार आपली संस्कृती आणि भूमीशी जोडलेले आहेत. त्यामुळे ते प्रेक्षकांचे आवडते होतात. त्यांनी बॉलिवूडची प्रेरणा घेऊ नये.”

गेल्या काही महिन्यात, पुष्पा, आर आर आर आणि केजीएफ: चॅप्टर 2; या दाक्षिणात्य चित्रपटांनी विक्रमी गल्ला गोळा केला आहे. त्या मानाने गेल्या 2 वर्षात बॉलीवूडचे जे चित्रपट आले, त्यांनी सरासरी गाठेल एवढाच धंदा केलेला आहे. तेव्हा कंगनाने दक्षिणात्य व हिंदी चित्रसृष्टीची तुलना केली. हिंदी सिनेमात स्टार्सच्या मुलांना वशिलेबाजीवर घेतले जाते. जी प्रेक्षकांना आवडत नाहीत. या निमित्ताने कंगनाने बॉलिवूड मधील घराणेशाही आणि वशिलेबाजी यांवर तोंडसुख घेतले आहे.