कंगना रणौत चे स्वातंत्र्याबाबत बेताल वक्तव्य : ...

कंगना रणौत चे स्वातंत्र्याबाबत बेताल वक्तव्य : देशभरातून तीव्र प्रतिक्रिया (Kangana Ranaut’s Irresponsible Comment On Independence : Trollers Blast Her)

बेताल आणि बेभान वक्तव्ये करून स्वतःवर आफत ओढवून घेण्यात कंगना रणौतचा अव्वल नंबर  आहे. आता असेच बेजबाबदार विधान करून कंगनाने लोकांची नाराजी ओढवून घेतली आहे.
“भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते ती तर भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ साली मिळाले”, अशी मुक्ताफळे कंगनाने एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात उधळली. त्यामुळे तिचे चाहते व इतर लोक कमालीचे नाराज झाले असून तिची निंदा करत आहेत.

कंगनाच्या या वादग्रस्त विधानाबाबत राजकीय क्षेत्रात आणि समाज माध्यमांवर पडसाद उमटले असून लोकांनी तिला लक्ष्य केले आहे. अलीकडेच तिला पद्म्श्री हा मनाचा पुरस्कार देण्यात आला होता. तो परत घेण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. तर आम आदमी पक्षाच्या एका महिला नेत्याने मुंबई पोलिसात, कंगनाविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.