कंगनाचे भयंकर वादग्रस्त ट्वीट : म्हणते – ...

कंगनाचे भयंकर वादग्रस्त ट्वीट : म्हणते – टॉयलेट स्वच्छ केले नाही तर गांधीजी आपल्या पत्नीला घराबाहेर काढत (Kangana Ranaut’s Controversial Tweet on Mahatma Gandhi: Says He Used To Push His Wife Out Of The House For Refusing To Clean Toilets)

ब्रिटनच्या राजघराण्यातील राजपुत्र हॅरी आणि त्याची पत्नी मेघन यांनी आपल्याच घराण्यावर केलेल्या वंशवादाच्या आरोपामुळे ते राजघराणे चर्चेत आले आहे. जगातील प्रत्येक घडामोडींवर भाष्य करणारी वाईट खोड असलेल्या कंगना रणौतने या प्रकरणावर ट्वीट करून आपण कॉन्ट्रोव्हर्शिअल क्विन असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.

ब्रिटनच्या राजघराण्यातील या वादावर महाराणी एलिझाबेथ यांना पाठिंबा देत कंगनाने ट्वीट केले व म्हटले की, ‘जगभरात ती एकमात्र महिला शासक शिल्लक राहिली आहे.’

नको त्या गोष्टीत नाक खुपसायची सवय असल्याने कंगनाने आणखी एक भयंकर वादग्रस्त ट्वीट केले आहे. एका युजरला उत्तर देत तिने थेट महात्मा गांधी यांच्यावर टीका केली आहे. गांधीजी चांगले पिता व पती होते का, यावर तिने शंका घेतली आहे. कंगना लिहिते – ” गांधीजींच्या मुलींनी ते एक वाईट पिता असल्याचा आरोप केलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या पत्नीने घरातील टॉयलेट स्वच्छ करण्यास नकार दिला, तर ते तिला घराबाहेर काढत, असे उल्लेख अनेक ठिकाणी आलेले आहेत. ते नक्कीच महान नेता होते, पण महान पती होऊ शकले नाहीत. पण पुरुषांच्या काही गोष्टी बाहेर आल्या की, जग त्यांना माफ करते.”

नियमितपणे वादग्रस्त ट्वीट करून नेहमी वाद ओढवून घेणारी कंगना वरील विधानावर सतत ट्रोल होते आहे. काही लोक तिला पाठिंबा देत आहेत, तर काही युजर्स तिची निर्भत्सना करत आहेत.

१० लोकप्रिय टी.व्ही. तारकांचे सिक्रेट टॅटू