कंगणा रणौतचा अधर्म; प्रसादाच्या थाळीत कांदा ठेव...

कंगणा रणौतचा अधर्म; प्रसादाच्या थाळीत कांदा ठेवला, लोकांची तीव्र नापसंती (Kangana Ranaut Trolled Brutally For Serving Onion With Prasad)

आ बैल मुझे मार, ही म्हण सार्थ करत, अंगावर वाद ओढवून घेणाऱ्या कंगना रणौतने आता नव्या वादाला तोंड फोडले आहे. तिनं अजब प्रकारची पोस्ट सोशल मीडियावर टाकून लोकांची नाराजी ओढवून घेतली आहे.

चैत्र नवरात्रीमधील अष्टमीच्या दिवशी कंगनाने ट्वीटर वर चाहत्यांना शुभेच्छा देत एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये देवीसमोर ठेवलेल्या प्रसादाच्या थाळीचा फोटो टाकला. अन्‌ तिच्या हातून अधर्म घडला, या भावनेने लोकांनी तिची खूपच निंदा केली. कारण कंगनाने या थाळीत कांदा वाढला होता.

प्रसादाच्या थाळीचा हा अजब फोटो शेअर करून कंगनाने म्हटलं होतं की, आपल्या घरातील प्रसादाची थाळी, अशी दिसत असेल, तर उपवास करणं किती अवघड असतं बघा. सोबत तिने चाहत्यांना अष्टमीच्या शुभेच्छा दिल्या.

प्रसादाच्या थाळीत कंगनाने वाढलेला कांदा पाहून निंदकांनी प्रतिक्रिया दिल्या. फेक हिंदू बाई व ढोंगी असं तिला म्हटलं. प्रसादाच्या थाळीत कांदा ठेवला जात नाही, असं लोकांनी तिला स्पष्ट बजावलं. दुसऱ्या एका युजरने लिहिलं, कट्टर हिंदू अष्टमीच्या उपवासाला कांदा खात नाहीत. कंगना, तू फेक हिंदू आहेस. आणखी एका युजरने म्हटलं, लसूण-कांदा वर्ज्य, हा नवरात्रीचा पहिला नियम आहे. बघता बघता लोकांनी कंगनाच्या या अधर्मावर तीव्र नापसंती व्यक्त केली.

कंगनाने निंदकांना दिले उत्तर ट्रोलर्सची भयंकर नाराजी पाहून कंगनाला स्पष्टीकरण देणे भाग पडले. ती म्हणाली, एखाद्याला प्रसादाबरोबर सॅलड खावेसे वाटले तर त्याची चेष्टा करू नये. ”हे कृत्य कोणाच्या भावना दुखावण्यासाठी नव्हतं. हिंदुत्वाची महती अशी आहे की, तो इतर धर्मासारखा कट्टर नाही. त्याची महती कमी लेखू नका. माझा आज उपवास आहे. पण माझ्या घरच्या लोकांना प्रसादामध्ये सॅलड खावेसे वाटले तर त्यांची निंदा करू नका,” असेही कंगनाने पुढे म्हटले आहे.