कंगना रणौतला झाला करोना! (Kangana Ranaut Tested...

कंगना रणौतला झाला करोना! (Kangana Ranaut Tested Positive For Covid-19)

एक वेळ होती जेव्हा कंगना रणौतला बॉलिवूडची क्वीन म्हटलं जायचं, परंतु मागील काही दिवसांत ती पंगा क्वीन बनली आहे. तिच्या बिनधास्त वक्तव्यामुळे ती कित्येक जणांसाठी डोकेदुखी झाली आहे. तिच्या अशाच बेताल वागण्याने तिचे ट्विटर अकाउंटही कायमचे बंद केले गेले आहे आणि आता कंगनाला करोना झाला आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्टद्वारे तिने आपल्याला करोना झाल्याची माहिती दिली आहे.

स्वत:चा ध्यानस्थ बसलेला फोटो शेअर करत, ‘गेल्या काही दिवसांपासून माझ्या डोळ्यांची जळजळ होत होती आणि मला अशक्तपणा जाणवत होता. मी हिमाचलला जाण्याचा विचार करत होते म्हणून काल करोना चाचणी करुन घेतली. आज सकाळी माझ्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मी स्वत:ला घरीच क्वारंटाइन करुन घेतले आहे. माझ्या शरीरातील या व्हायरसची मला कल्पना नव्हती, पण आता मी त्यास जास्त वेळ राहू देणार नाही. कृपया तुम्हीही यास घाबरू नका. आपण सगळ्यांनी मिळून यास पळवून लावूया. कोविड-१९ हा केवळ थोडा वेळ राहणारा प्लू आहे बाकी काही नाही… आणि हा लोकांना घाबरवत आहे. हर हर महादेव’ असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेने बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील अनेकांना आपल्या विळख्यात ओढले आहे. त्यामुळेच रोजच्या रोज कोणी ना कोणी कलाकार करोनाग्रस्त झाल्याची बातमी येत आहे.