कंगना रणावतने घेतली सलमान खानची मस्त फिरकी : बो...

कंगना रणावतने घेतली सलमान खानची मस्त फिरकी : बोलली ‘ये आपके बडे भाई का घर नही है’ (Kangana Ranaut Takes A Dig At Salman Khan : Says Yeh Aapke Bade Bhai Ka Ghar Nahi Hain)

कंगना रणावत आता मनोरंजन क्षेत्रात नवा डाव खेळायला सज्ज झाली आहे. एकता कपूर सोबत ती ‘लॉकअप’ नावाचा नवा कार्यक्रम करते आहे. त्याचा एक व्हिडीओ हल्ली खूप व्हायरल होत आहे. त्यामध्ये कंगनाने, सलमान खानची मस्त फिरकी घेतली आहे.

या व्हिडिओत दिसतंय की, कंगना परीक्षकाच्या खुर्चीत बसून स्टेजवर शानदार एन्ट्री घेते. अन माईक हाती घेऊन बोलते, ‘लॉकअप मध्ये जाण्यासाठी तयार आहात का? पण हे तुमच्या मोठया भावाचं गर नाही. हा माझा तुरुंग आहे. इथे होईल अत्याचाराचं खेळ. तुम्ही रेडी तयार आहेत का? नंतर ती ही संधी दिल्याबद्दल एकता कपूरचे आभार मानते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने कंगनाने सलमानला लक्ष्य केले आहे. असं लोकांना वाटत आहे. सलमान बिग बॉस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. त्यात त्याला ‘बडा भाई’ असं संबोधलं जातं. त्यामुळे कंगनाने सलमान वर निशाणा साधला आहे, असं बोललं जातं.

या ‘लॉकअप’  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कंगना करते आहे. त्यामध्ये १६ मान्यवरांना अनेक महिने लॉकअप  मध्ये ठेवलं जाईल. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सूत्रधारावर, अर्थात कंगनावर राहील.