कंगना रणावतने पुन्हा आलिया भट्टला केले लक्ष्य म...

कंगना रणावतने पुन्हा आलिया भट्टला केले लक्ष्य म्हणते – ‘या शुक्रवारी २०० कोटी होतील जाळून खाक…’ (Kangana Ranaut Takes A Dig At Gangubai Kathiawadi – Criticises Alia Bhatt)

आलिया भट्टची  प्रमुख भूमिका असलेला ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट विवादास्पद ठरला आहे. काहींना असे वाटते की, आपली गुळगुळीत इमेज सोडून आलियाने मोठी आव्हानात्मक भूमिका स्वीकारली आहे. तर काहींना असे वाटते की या भूमिकेसाठी आलिया भट्ट अनफिट आहे.

या मुद्यावर कंगना रणावतने पुन्हा एकदा आलियावर सडकून टीका केली आहे. तिच्या मते पात्रांची निवड हीच या चित्रपटाची मोठी कमतरता आहे. त्यामुळे आपल्या इन्स्टास्टोरी वर पोस्ट करत ती म्हणते – ” या शुक्रवारी, बॉक्स ओफिसवर २०० कोटी जाळून खाक होतील पप्पाच्या ( मुव्ही माफिया डॅडी) पारीसाठी (जिच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट आहे.) कारण हे पप्पा सिद्ध करू इच्छितात की, ही रॉमकॉम  बिंबो  ऍक्टिंग पण करू शकते… चुकीची पात्रयोजना हा या सिनेमास लागलेला कलंक आहे…. हे लोक सुधारणार नाहीत…”

यापुढे कंगना लिहिते – ” या बॉलिवूड माफिया पप्पाने एकट्यानेच चित्रउद्योगाचं वर्क कल्चर बदलून टाकलं आहे. त्याने कित्येक मोठ्या दिग्दर्शकांना भावुकतेने नियंत्रणाखाली आणले. अन आपला दर्जाहीन माल चांगल्या सिनेमावर खपवला या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर हेच उदाहरण समोर येईल…. त्यांना पाहणे लोकांनी बंद केले पाहिजे. एक बडा हिरो आणि उत्कृष्ट दिग्दर्शक त्याच्या चतुराईला बळी पडल्याचे येत्या शुक्रवारी दिसून येईल.”