आलिया-रणबीरने डिजर्विंग कलाकारांचे पुरस्कार घेत...

आलिया-रणबीरने डिजर्विंग कलाकारांचे पुरस्कार घेतल्याचा कंगनाचा आरोप; दादा साहेब फाळके पुरस्कार कमिटीलाही ठरवलं चुकीचं (Kangana Ranaut Takes A Dig At Alia Bhatt And Ranbir Kapoor They Won Dadasaheb Phalke Award)

नुकतेच दादा साहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२३ पार पडला. यावेळी आलिया भट्टला ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला तर तिचा पती रणबीर कपूरला ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमासाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

आता अभिनेत्री कंगना रनौतनं परीक्षकांचा हा निर्णय धुडकावत आलिया-रणबीरवर डिजर्विंग कलाकारांचे पुरस्कार घेण्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कंगनानं दादा साहेब फाळके पुरस्कार कमिटीलाच चुकीचं ठरवलं आहे.

पोस्टमध्ये कंगनानं लिहिलंय, ”पुरस्कारांच्या सिझनची सुरुवात झाली आहे. घराणेशाही पुन्हा एकदा जिंकली. त्यांनी पात्र लोकांकडून त्यांचे पुरस्कार हिसकावून घेतले.”

कंगनानं पुढं लिहिलं आहे- ”२०२२ मध्ये हे काही असे कलाकर आहेत ज्यांनी खूप उत्तम परफॉर्मन्स दिले आहेत. रिषभ शेट्टी आणि मृणाल ठाकूर हे त्यापैकी एक आहेत”. कंगनानं आपली बनवलेली बेस्ट अॅक्टर्सची लिस्ट पुढे करत बेस्ट डायरेक्टरसाठी एस एस राजामौली, बेस्ट सपोर्टिंग अॅक्टरसाठी अनुपम खेर आणि बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेससाठी तब्बूचं नाव सामिल केलं आहे.

Kangana On Nepotism

कंगनानं लिहिलं आहे- ”बॉलीवूड पुरस्कारांमध्ये सगळी फसवणूक होते. मला जेव्हा माझ्या कामातून वेळ मिळेल तेव्हा मी डिजर्विंग अॅक्टर्सची लिस्ट बनवेन. धन्यवाद”.

आलिया-रणबीरवर निशाणा साधल्यामुळे कंगनाला खूप ट्रोल केलं गेलं. लोकांनी कंगनाला तिच्या ‘धाकड’ सिनेमाची आठवण करून दिली, जो बॉक्सऑफिसवर वाईटरित्या कोसळला होता.

Kangana On Nepotism:

एका ट्रोलरनं म्हटलं की- ‘वर्षातला सगळ्यात खराब सिनेमा करण्यासाठीचा अॅवॉर्ड तुझ्या धाकडला देखील दिला पाहिजे’.

Kangana On Nepotism:

तर दुसऱ्या एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की- ‘वाटतं तू स्वतःचे अॅवॉर्ड द्यायला सुरुवात केलीस’. तर आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की – ‘धाकड या वर्षातला सगळ्यात वाईट सिनेमा आहे’.