लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली नाही म्हणू...

लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली नाही म्हणून ग्रॅमी आंणि ऑस्कर पुरस्कारांवर कंगनाची आगपाखड : म्हणते यांच्यावर बहिष्कार घाला! (Kangana Ranaut Slams, Grammy, Oscars For Ignoring Lata Mangeshkar, Says – We Should Boycott These Events)

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली नाही, म्हणून ग्रॅमी आंणि ऑस्कर पुरस्कार सोहळ्यांबाबत एकीकडे सोशल मीडियावर, लोक रोष व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे या वादात कंगना रणावतने उडी घेऊन आगपाखड केली आहे.

ऑस्कर पारितोषिक वितरण सोहळ्यात लतादीदी आणि दिलीपसाहेबांना श्रद्धांजली वाहिली नव्हती. त्यावर चाहते राग व्यक्त करत होते. आता तर ग्रॅमी हे संगीताचे पुरस्कार असताना, त्याच्याही वितरण सोहळ्यात स्वरकोकिळेस श्रद्धांजली वाहिली नाही, म्हणून कंगनाच्या रंगाचा पारा चढला. तिने या कार्यक्रमांना ‘लोकल इव्हेंट’ असे हिणवत, त्यांचा बहिष्कार करण्याची मागणी केली आहे.

कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. त्यात ती लिहिते ” अशा लोकल अवॊर्ड शो बाबत आपण कडक धोरण स्वीकारले पाहिजे. हे कार्यक्रम इंटरनॅशनल असल्याचा दावा करतात, पण स्वतःच्या विचारसरणी नुसार आपल्या लोकांना जाणूनबुजून खड्यासारखे दूर सारतात… आपल्या प्रसिद्धी माध्यमांनी या पक्षपाती लोकल कार्यक्रमांवर पूर्णपणे बहिष्कार घातला पाहिजे.”

ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामधील ‘इन मेमोरियम’ या विभागात, ज्या लोकांचे अलीकडेच निधन झाले, त्या जगभरातील कलाकारांची आठवण काढण्यात आली. पण लता मंगेशकर यांचे त्यात नाव नव्हते.