ब्रह्मास्त्रच्या पूर्ण टीमवर कडाडून टीका करून क...

ब्रह्मास्त्रच्या पूर्ण टीमवर कडाडून टीका करून कंगना रणावत म्हणते अयान मुखर्जीला जिनियस म्हणेल त्याला जेलमध्ये टाका (Kangana Ranaut slams Brahmastra team, Says ‘Everyone who called Ayan Mukerji a genius should be jailed’)

रणबीर कपूर- आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. सध्या या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाची चांगली ओपनिंग झाली असून पहिल्याच दिवशी चित्रपटाने 35 कोटींचा व्यवसाय केल्याचे बोलले जात आहे. आता कंगना रणावतने या चित्रपटाबाबत आपली प्रतिक्रिया दिली असून अयान मुखर्जीपासून ते करण जोहर, आलिया भट्ट आणि रणबीर कपूरपर्यंत, अगदी केआरकेच्या अटकेवरही निशाणा साधला आहे. शिवाय यासाठी चित्रपटाला जबाबदार धरले आहे.

कंगनाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एकामागून एक अशा काही लांबलचक पोस्ट लिहून ब्रह्मास्त्रच्या संपूर्ण टीमवर राग व्यक्त केला आहे. सर्वप्रथम, तिने चित्रपटाच्या नकारात्मक प्रतिक्रियांचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिले, जेव्हा तुम्ही खोटे बोलता तेव्हा असे होते. करण जोहर लोकांना प्रत्येक शोमध्ये रणवीर-आलियाला सर्वोत्कृष्ट कलाकार आणि अयान मुखर्जीला जिनियस म्हणण्यास भाग पाडतो. जेणेकरून लोक हळूहळू या खोट्यावर विश्वास ठेवू लागतील. आपल्या कारकिर्दीत एकही चांगला चित्रपट न बनवलेल्या दिग्दर्शकाला 600 कोटींच्या बजेटचा चित्रपट दिला गेला.

कंगनाने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “जो कोणी अयान मुखर्जीला जिनियस म्हणेल त्याला तुरुंगात टाकले पाहिजे, त्याला हा चित्रपट बनवायला 12 वर्षे लागली, त्याने या चित्रपटासाठी 400 पेक्षा जास्त दिवस शूट केले… 600 कोटींची वाट लावली… धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्नही केला आहे. शेवटच्या क्षणी चित्रपटाचे नाव जलालुद्दीनवरून शिवा असे बदलले. अशा लोकांना प्रतिभावंत म्हणणे म्हणजे रात्रीला दिवस आणि दिवसाला रात्र म्हणण्यासारखे आहे.

कंगनाने पुढे लिहिले- “करण जोहरसारख्या लोकांना विचारले पाहिजे ज्यांना चित्रपटाच्या स्क्रिप्टपेक्षा इतरांच्या सेक्स लाईफमध्ये जास्त रस असतो. इतर वेळी ते प्रतिसाद, कलाकार, बॉक्स ऑफिस कलेक्शन खरेदी करतात. यावेळी त्यांनी हिंदुत्व आणि दक्षिणात्य सिनेसृष्टीची मदत घेतली.  अचानक सगळे पुजारी झाले, प्रत्येकाने आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दाक्षिणात्य कलाकारांसमोर हात जोडले. ते सर्व काही करू शकतात पण सक्षम लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आणि कलागुणांना संधी देऊ शकत नाहीत… आणि त्यामुळेच ब्रह्मास्त्र सारखा वाईट चित्रपट बनतो.

कंगणा इथेच थांबली नाही, केआरकेच्या अटकेसाठीही तिने या लोकांनाच जबाबदार धरले. तिने पुढे लिहिले, “त्यांचा समूहवादच आता त्यांना नडत आहे. बेबीच्या लग्नापासून ते पीआर पर्यंत, प्रतिक्रिया विकत घेणे, मीडियावर नियंत्रण ठेवणे, केआरकेला तुरुंगात पाठवणे…ते सर्व काही बेईमानीने करू शकतात पण नीट प्रामाणिकपणाने चित्रपट बनवू शकत नाहीत.”

‘ब्रह्मास्त्र’मुळे PVR आणि INOX मल्टिप्लेक्सला 800 कोटींचे नुकसान झाल्याचा दावाही कंगनाने केला आहे. कंगनापूर्वी विवेक अग्निहोत्रीनेही असेच काहीसे म्हटले होते.