कंगनाने बिकिनीतले फोटो टाकून म्हटले, ‘मी हॉट सं...

कंगनाने बिकिनीतले फोटो टाकून म्हटले, ‘मी हॉट संघी’, ट्रोलर्सना दिले उलट उत्तर (Kangana Ranaut Shares Hot Bikini Pics With Caption To Hit Back At Trollers, Describes Herself As ‘Hot Sanghi’)

कंगना रणौतला सदैव चर्चेत कसं राहायचं हे चांगलंच माहीत झालं आहे. सोशल मीडियावर विशेष करून वादग्रस्त वक्तव्यांसाठीच ती ओळखली जाते. कंगनाचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक झाल्यानंतर तिने आपला मोर्चा इन्स्टाग्रामकडे वळवला आहे. हल्ली ती इन्स्टाग्रामचा वापर मोठ्या प्रमाणावर करताना दिसते. नुकतेच या पंगा क्वीनने आपले बिकिनीमधील अतिशय बोल्ड फोटो शेअर करत लिबरल्स सोबत पंगा घेतला आहे.

कंगना रणौत सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते आणि आपल्या खासगी जीवनाशी संबंधित सर्वच मुद्द्यांवर ती बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. कंगनाने प्रसिद्ध केलेले बोल्ड फोटो आणि त्या फोटोंना दिलेली कॅप्शन प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

स्वतःला म्हटले ‘हॉट संघी’

अलिकडेच कंगनाने इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टेटसवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने बिकिनी परिधान केली आहे. पहिल्या फोटोमध्ये तिने गोल्डन बिकिनी परिधान केली आहे. या फोटोवर तिने लिहिलंय की, -‘लिबरल्स म्हणाले की, संघी महिला हॉट नसतात, मी: थांबा जरा..’ या आशयाची कॅप्शन दिली आहे.

कंगनाने आणखी एक बोल्ड फोटो शेअर केला आहे, ज्यात ती काळ्या बिकिनीमध्ये दिसत आहे. या फोटोवर कंगनाने ‘हॉट संघी’ असं लिहिलं आहे.

ट्रोलर्सना दिले उलट उत्तर

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका ऑडियो क्लिपला उत्तर देण्यासाठी कंगनाने ही पोस्ट दिली आहे. या ऑडियोमध्ये संघी लोकांवर ताशेरे ओढण्यात आले असल्याचे समजते. या ऑडियोत एका महिलेने, संघी आकर्षक वा हॉट असत नाहीत असे बोलल्याचे ऐकण्यात येते. आता त्या सगळ्यांना उलट उत्तर देताना कंगनाने म्हटलंय की, ‘ती संघी आहे आणि ती छोटे कपडेही घालते.’ कंगनाचे हे फोटो वाऱ्यासारखे पसरत आहेत आणि चाहतेही त्यावर भरपूर लाइक्स आणि कमेंट्‌स करत आहेत.

कंगणा रणौत नेहमी बीजेपी आणि संघाची बाजू घेताना दिसते, त्यामुळेही बरेचदा तिला ट्रोलला सामोरे जावे लागते.

अर्धवट कर भरल्यामुळेही आली होती चर्चेत

याआधी कंगना आर्थिक अडचणीमुळे तिला गेल्या वर्षी पूर्ण कर भरता आला नाही, या कारणामुळे चर्चेत आली होती. तिच्याकडे कोणतंच काम नसल्यामुळे कर भरण्यास उशिर होत असल्याची तिने कबुली दिली आहे. तसेच सरकार माझ्या थकित करावर व्याज जोडत आहे, असंही तिने म्हटले होते. पुढे तिनं लिहिलं होतं-  “जरी मी सगळ्यात जास्त कर भरणारी अभिनेत्री असली तरी सध्या माझ्या हातात काही काम नाही. मी माझ्या एकूण कमाईच्या ४५ टक्के इतका कर भरत असते. पण आता काम नसल्यामुळे मी आतापर्यंत गेल्या वर्षीचा अर्धा कर भरलेला नाही. पैसे नसल्यामुळे मला तो भरता आला नाही.”

कंगना रणौत नुकतेच हिमाचल येथून आपल्या मुंबईतील घरी परतली आहे. काही दिवसांपूर्वी पाली हिल येथील आपल्या ऑफिसमध्येही तिला पाहिले गेले होते. तेथेही मास्क न घातल्याने तिला ट्रोल व्हावे लागले होते.  

याआधीही शेअर केलेत बिकिनीतील फोटो

मागच्या वर्षीही कंगनाने तिचे बिकिनीतले फोटो प्रदर्शित केले आहेत. तिचे ते बिकिनीतील फोटो तुफान व्हायरल झाले होते आणि बऱ्याच जणांनी ते पाहिले होते.