कंगनाचा पेस्ट्री तोंडाजवळ नेऊन पुन्हा ट्रे मध्य...

कंगनाचा पेस्ट्री तोंडाजवळ नेऊन पुन्हा ट्रे मध्ये ठेवतानाचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले, म्हणाले, ‘ही तर करोना पसरवते…’ (Kangana Ranaut Puts The Pastry Back On The Plate After Posing To Eat It, Netizens Say, ‘Ye Corona Phaila Rahi Hai’)

बॉलिवूडची क्वीन आणि खऱ्या आयुष्यातील पंगा क्वीन कंगना रनौतला तिचा खोडकरपणा महागात पडलाय. सोशल मीडियावर कंगनाचा तो व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकरी जाम संतापले आहेत. या व्हिडीओवरुन तिला ट्रोल केले जात आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने कंगनाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती प्लेटमधून पेस्ट्री घेते, तोंडाजवळ घेऊन जाते आणि परत त्या प्लेटमध्ये ठेवते. कंगनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर कंगना प्रचंड सक्रिय असते. ती सामाजिक विषयावर बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. काही दिवसांपूर्वी कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाबमधील सुरेक्षवरुन काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता कंगनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.

एका यूजरने कमेंट करत, ही तर करोना पसरवते असे म्हटले आहे. तर दुसऱ्या यूजरने ‘मस्तच, पहिले तिने हातात ती पेस्ट्री घेतली, नंतर तिने श्वास घेतला आणि नंतर पुन्हा प्लेटमध्ये ठेवली. आता ती पेस्ट्री दुसरं कुणी तरी खाणार’ अशी कमेंट करत कंगनाला सुनावले आहे. तिसऱ्या एका यूजरने, ‘करोना काळात कंगनाचे असे वागणे चुकीचे आहे’ असे म्हटले आहे. तर काहींनी ती खोडकरपणा करत असतानाही सुंदर दिसत असल्याचे म्हटले आहे.

कंगनाच्या कामाबद्दल सांगायचं तर तेजस, सीता आणि धाकड हे कंगनाचे आगामी प्रोजेक्ट आहेत.

फोटो/ व्हिडिओ सौजन्य : इन्स्टाग्राम / विरल भयानी