कंगना रणौतच्या आयुष्यात आलं आहे कुणीतरी खास (Ka...

कंगना रणौतच्या आयुष्यात आलं आहे कुणीतरी खास (Kangana Ranaut Opens Up About Her Wedding Plans, Reveals She Has Someone Special In Her Life)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या कामामध्ये यशोशिखरावर आहे. नुकतेच तिला राष्ट्रपतींच्या हस्ते प्रतिष्ठीत असा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. एका मुलाखतीमध्ये कंगनाने तिच्या भविष्यातील योजनांबद्दलचा खुलासा केला ज्यात तिने पुढील पाच वर्षांत तिला स्वतःचं कुटुंब बनविण्याची इच्छा असल्याचं म्हटलं आहे.

टाइम्सला दिलेल्या मुलाखती दरम्यान कंगनाने सांगितले की, पुढील पाच वर्षांच्या आत तिला लग्न करायचेच आहे शिवाय मुलंही हवी आहेत. ती स्वतःला पत्नी आणि आईच्या रूपात पाहू लागली आहे. आपल्या आयुष्यात कोणीतरी ‘खास’ असल्याचंही तिने आपल्या चाहत्यांना सूचित केलं आहे. लवकरच कंगना तिच्या भावी पतीबद्दल सर्वांना सांगणार आहे.

मुलाखतीदरम्यान, जेव्हा अभिनेत्रीला विचारले की, ती भविष्यात आई आणि पत्नीचा समावेश असलेल्या कोणत्याही प्रोजेक्टवर काम करत आहे का? हे ऐकून कंगनाला हसू आलं आणि हसत हसतच ती, हो म्हणाली. कंगनाला तिच्या आयुष्याच्या जोडीदाराबद्दल विचारण्यात आले तेव्हा, “लवकरच तुम्हाला कळेल असं तिनं म्हटलं आहे.

गँगस्टरसारख्या चित्रपटातून कंगना रणौतने आपल्या करिअरची सुरुवात केली. हा चित्रपट कंगनासाठी मैलाचा दगड ठरला. आणि तिच्या पहिल्या चित्रपटासाठी कंगनाला बेस्ट फीमेल डेब्यू  पुरस्कार मिळाला. तेव्हापासून आजपर्यंत या अभिनेत्रीने मागे वळून पाहिलेच नाही. क्वीन, मणिकर्णिका, तनु वेड्स मनू यासह अनेक चित्रपटांमध्ये चमकदार भूमिका साकारणाऱ्या कंगनाने आपल्या जबरदस्त अभिनयाने लाखोंची मने जिंकली.