कंगना रणौत पुन्हा प्रेमात पडलीय! सोशल मीडियावर ...

कंगना रणौत पुन्हा प्रेमात पडलीय! सोशल मीडियावर त्या ‘खास’ व्यक्तीसाठी लिहिली रोमॅन्टिक नोट (Kangana Ranaut has found love again! Actress shares romantic note for ‘someone special’)

पंगा गर्ल कंगना रणौत, नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते, ती केवळ बॉलिवूडची क्वीन नाही तर सोशल मीडियाची क्वीन देखील आहे. बरेचदा तिला तिच्या निर्दोष शैली आणि वादग्रस्त विधानांमुळे ट्रोलचे लक्ष्य केले जाते. पण यावेळी कंगना वादग्रस्त वक्तव्यामुळे नाही तर तिच्या रोमॅन्टिक स्टाईलमुळे चर्चेत आहे आणि इंस्टाग्रामवरील तिची रोमॅन्टिक नोट पाहून तिच्या आयुष्यात कोणीतरी खास व्यक्ती आली आहे, असा चाहते अंदाज लावत आहेत.

वास्तविक, कंगनाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर रोमॅन्टिक कॅप्शनसह दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये तिने एका जोडप्याने एकमेकांना मिठी मारल्याचे स्केच शेअर केले आहे, ज्यासोबत कंगनाने एक गोंडस कॅप्शनही लिहिली आहे. तिने लिहिले आहे, ‘तेरे लिए हम हैं जिये…कितने सितम हम पे सनम…’

त्याचवेळी, कंगनाने तिच्या दुसऱ्या पोस्टमध्ये तिचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्येही कंगना प्रेमाविषयी बोलताना दिसत आहे. बालपणीचा हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिले की, “मी एक सामान्य मुलगी आहे, माझा प्रेमाच्या सौंदर्यावर विश्वास आहे, या बाबीशिवाय माझ्यामध्ये काही खास नाही आणि या प्रेमामुळेच मी या सुंदर जगात आले आहे.”

कंगना राणौतची ही पोस्ट पाहून तिच्या आयुष्यात एका खास व्यक्तीचा प्रवेश झाल्याचे दिसते. या खास व्यक्तीबाबत कंगनाने कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र, प्रेमावर बोलण्याची कंगनाची ही पहिलीच वेळ नाही. असे तिने यापूर्वीही सांगितले आहे.

याआधी कंगनाने तिच्या एका मुलाखतीत प्रेम आणि भविष्यातील नियोजनाबद्दल भाष्य केले आहे. मुलाखतीत लग्नाबाबत प्रश्न विचारला असता, “मला लग्न करायचे आहे आणि मुलंही हवी आहेत. पुढील पाच वर्षांत मला स्वतःला आई आणि पत्नी म्हणून बघायचे आहे.”असे कंगना म्हणाली होती.

तसे पाहिले तर, कंगना यापूर्वीही एकदा नव्हे तर अनेक वेळा प्रेमात पडली आहे. हृतिक रोशन, अजय देवगण, आदित्य पंचोली, अध्यायन सुमन इत्यादी कलाकारांसोबत तिचे नाव जोडले गेले आहे. तिच्या प्रत्येक प्रेमकहाणीचा शेवट केवळ वादातच झालेला आहे ही गोष्ट वेगळी.

गेल्या काही दिवसांपासून कंगना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शीख समुदायाविरोधात अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप करत कंगनावर अनेक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत आणि त्यामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे.