हिमाचल प्रदेशातील निसर्गाच्या सान्निध्यात कंगना...

हिमाचल प्रदेशातील निसर्गाच्या सान्निध्यात कंगना रणावतची कौटुंबिक सहल (Kangana Ranaut Goes Out On A Picnic With Family In Himachal Pradesh, Shares Photos With Sister Rangoli, Nephew And Parents)

बॉलिवूडची बिनधास्त , बोलघेवडी कंगना रणावत सध्या हिमाचल प्रदेशातील मनाली या हिल स्टेशनवर विहार करते आहे . या अभिनेत्रीने अलिकडेच मनाली परिसरातील सुंदर छायाचित्रे सोशल मिडियावर पोस्ट केली आहेत . त्यामध्ये त्यात तिच्यासोबत तिचे आई – बाबा , बहीण भाणि भाचा दिसत आहे .

‘ धाकड ‘ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केलेली धावपळ आणि त्याच्या अपयशाने आलेला ताण घालविण्यासाठी बहुधा कंगना , आपल्या कुटुंबियांसह या सहलीला गेली असावी . आपला आवडता पिकनिक स्पॉट मनाली येथील सहलीचे क्षण तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये कंगना तणावविरहीत आणि सहलीच्या मूडमध्ये आनंदी दिसते आहे . तिनं तेथील वातावरणाला साजेसा असा पोल्का डॉट ड्रेस घातलाय. अन् डोक्यावर छानशी हॅट घातली आहे . मेकअप न करता , झाडाखाली पोज देताना कंगना आनंदित दिसते आहे . या सहलीत तिच्यासोबत बहीण रंगोली , भाचा पृथ्वी आणि तिचे आई – वडील आहेत.

 कधी नदीकिनारी , तर कधी झाडाखाली तर कधी खडकांवर बसून कंगना विरंगुळ्याचे क्षण घालवत आहे .

या छानशा फोटोंमध्ये कंगनाचे बाबा , तिच्या आईला घास भरवताना दिसत आहेत .

तर दुसऱ्या फोटोत कंगना आपल्या आईच्या खांद्यावर डोके ठेवून झोपली आहे . 

हिमाचल प्रदेश या आपल्या मायभूमीत विहरणारी कंगना , तेथील सुंदर फोटो प्रसिद्ध करून , आपल्या चाहत्यांना अपडेट करते आहे.