कंगना रणौतने केले उत्तेजक फोटोंचे प्रदर्शन : पा...

कंगना रणौतने केले उत्तेजक फोटोंचे प्रदर्शन : पाहा तिचं ग्लॅमरस्‌ रूप (Kangana Ranaut Gets Her Photoshoot Done In Revealing Dress : See Her Glamorous Look)

बॉलिवूडची बेफाम आयुष्य जगणारी तारका आहे कंगना रणौत. ती काही ना काही निमित्ताने सदैव प्रकाशझोतात राहते. साडीच्या पेहरावात ती खूप आकर्षक दिसते. तरी पण आता तिनं थोडंसं अंगप्रदर्शन करणारे असे फोटो काढले की, ते पाहून चाहते उत्तेजित झाले. अन्‌ फोटो बघता बघता व्हायरल झाले.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

कंगनाने आपले उत्तेजक फोटो प्रसिद्ध करून इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. या फोटोंना वापरकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. भरपूर कमेंटस्‌ मिळत आहेत. बहुतेक करून साडीत दिसणारी कंगना या तोकड्या आधुनिक कपड्यांमध्ये आकर्षक दिसत असली तरी तिनं आपल्या चाहत्यांना गोंधळात टाकलं आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

या फोटोंमध्ये ती मोकळे केस, हाय हिल्स आणि तोकडा ड्रेस घातलेल्या अवतारात दिसते आहे. हातात तिनं छानसा पुष्पगुच्छ घेतला आहे.

”आज मी बॉली बिंबो बनायचं ठरवलं. अन्‌ बुद्धिमान इन्स्टा फॅमिलीसाठी अगदी इन्स्टाग्राम स्टाईलमध्ये मी हे फोटो काढून घेतले.” असा मजकूर तिनं फोटोंसोबत लिहिला आहे.

सध्या कंगना रणौत ‘धाकड’ या आगामी चित्रपटासाठी हंगेरी देशातील बुडापेस्ट या शहरात गेली आहे. तिथून तिनं हे फोटो शेअर केले आहेत.