‘धाकड’ च्या अपयशाने कंगना खचली नाही...

‘धाकड’ च्या अपयशाने कंगना खचली नाहीच, उलट म्हणते- ‘मी आहे बॉक्स ऑफिसची राणी’ (Kangana Ranaut Breaks Silence On Dhaakad Failure, Calls Herself ‘Box Office Queen Of India’)

 गेले काही दिवस कंगना तिच्या ‘धाकड’ या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत होती. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट होईल अशी तिची अपेक्षा होती. पण तिची ती अपेक्षा सपशेल फोल ठरली.  कारण तिच्या धाकड चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवून कार्तिक आर्यनच्या ‘भूल भूलैया 2’ ला पसंती दर्शवली. त्यामुळे कंगनाचा बिगबजेट ‘धाकड’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. त्यामुळे लोकांनी कंगनाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. या ट्रोलिंगवर कंगना काही दिवस शांत राहिली मात्र आता तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून या ट्रोलिंगला उत्तर दिले आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट टाकून ती स्वत: बॉक्स ऑफिसची राणी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

कंगनाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्यातून तिचा चित्रपटांचा पूर्वइतिहास सांगितला. तिने पोस्टमध्ये धाकड चित्रपटाचा उल्लेख केलेला नाही मात्र, तिचा एक चित्रपट चालला नाही म्हणून काय झालं? तिची जादू कायम आहे आणि पुढेही ती तशीच राहील असे सांगायचा प्रयत्न केला आहे. कंगानाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही स्क्रीनशॉट शेअर केले, त्यात कंगनाला ‘बॉक्स ऑफिस क्वीन ऑफ इंडिया’ असा टॅग दिला आहे. कंगनाने पोस्टमध्ये लिहिलेले की, 2019 मध्ये तिने सुपरहिट चित्रपट ‘मणिकर्णिका’ दिला. त्या चित्रपटाने 160 करोड रुपयांचा गल्ला जमवला. 2020 हे कोरोनाचे वर्ष होते. 2021 मध्ये माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा चित्रपट ‘थलाइवी’ प्रदर्शित झाला. या चित्रपटानेसुद्धा ओटीटीवर खूप यश मिळवले,

पुढे कंगनाने लिहिले की तिला खूप नकारात्मकता दिसत आहे. पण 2022 मध्ये तिने ‘लॉकअप’चे सूत्रसंचालन केले त्यामुळे माझे हेही वर्ष ब्लॉकबस्टर ठरले…हे इथेच संपत नाही. मला अजून खूप आशा आहेत. सुपरस्टार कंगना रणावत बॉक्स ऑफिस क्वीन ऑफ इंडिया आहे.

कंगनाचा धाकड चित्रपट 20 मे ला प्रदर्शित झाला. कंगनाचा हा अॅक्शन चित्रपट असल्याने तिला त्या चित्रपटाकडून खूप आशा होती. पण कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 2’ पुढे तो चित्रपट 1 आठवडाही चालला नाही. धाकड हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. या चित्रपटाने केवळ 4 करोड रुपयांचा बिझनेस केला. त्यामुळे सोशल मीडियावर लोक कंगणाची खूप खिल्ली उडवत आहेत.