कंगना रनौतला २ राष्ट्रीय पुरस्कार, तर सुशांत सि...

कंगना रनौतला २ राष्ट्रीय पुरस्कार, तर सुशांत सिंह राजपूतचा ‘छिछोरे’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट (kangana Ranaut Bags 2 National Awards, Sushant Singh Rajput’s ‘Chhichhore’ Is Best Film)

नवी दिल्ली येथून ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून विविध विषयांवर वादग्रस्त ठरलेल्या अभिनेत्री कंगना रणौतला २ राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.
स्वतःला निरनिराळ्या वादात ओढवून घेणाऱ्या कंगना रणौतने आपण अभिनेत्री म्हणून सर्वश्रेष्ठ आहोत, हे या पुरस्कारांनी शिक्कामोर्तब केले आहे. ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ या दोन हिंदी चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी, सवोत्कृष्ट अभिनेत्रीचे हे सन्मान कंगनाला लाभले आहेत.

राष्ट्रीय पुरस्कारांच्या इतिहासात एखाद्या अभिनेत्री वा अभिनेत्याला, एकाच वेळी २ पुरस्कार मिळविल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे कंगनाची कामगिरी अद्‌भूत ठरली आहे. ‘मणिकर्णिका’ हा चित्रपट झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांची शौर्यगाथा आहे. कंगनाने स्वतः त्याची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे कंगनाला तिच्या चित्रपट करिअरमधला हा चौथा पुरस्कार आहे.
चित्रसृष्टीत राष्ट्रीय पुरस्कार सर्वोच्च मानाचे समजले जातात. करोनाच्या महामारीमुळे गेल्या वर्षी पुरस्कारांची घोषणा केंद्र सरकारने केली नव्हती. त्यामुळे यंदा जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारात २०१९ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना प्रमाण धरण्यात आले आहे.
सुशांत सिंह राजपूत अभिनीत ‘छिछोरे’ या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून सन्मान मिळाला आहे. तर मनोज वाजपेयीला ‘धनुष्य’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

चाळीशी गाठलेल्या श्वेता तिवारीने दाखवला जवानीचा जलवा