कंगनाने केली मागणी, मंदिरे मुक्त करा (Kangana R...

कंगनाने केली मागणी, मंदिरे मुक्त करा (Kangana Ranaut backs Sadhguru’s call to ‘Free Tamil Nadu Temples’, Says Shame On Us)

एखाद्या गोष्टीला न्याय मिळवून देण्यासाठी त्याच्या बाजूने खंबीरपणे उभी राहणारी बॉलिवूड क्वीन कंगना रनौत आता आध्यात्मिक गुरू सद्‌गुरु यांच्या सहकार्यासाठी त्यांच्यासोबत उभी राहिली आहे. सद्‌गुरुंनी तामिळनाडूची मंदिरे शासनाकडून मुक्त करण्यासाठी जी मोहिम हाती घेतली आहे, त्याचे कंगनाने समर्थन केले आहे. मंदिरांच्या जीर्णावस्था पाहून दुखावलेल्या कंगनाने ‘मंदिरांवर प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे,’ असं म्हटलं आहे.

कंगनाने काय लिहिलंय ट्वीटमध्ये?
एका युजरने मंदिराची अतिशय वाईट परिस्थिती पाहून त्या मंदिराचा फोटो शेअर करत असं लिहिलं की, मंदिरं आपल्या देशाचा वारसा जपतात. याच युजरला उत्तर देताना कंगनाने आपल्या ट्वीटमध्ये असं लिहिलं आहे की,- ”मंदिरं ही केवळ पुजा-प्रार्थना करण्याची जागा नाही. ही मंदिरं आपले प्राचीन ज्ञान, परंपरा, वारसा आणि कला यांचं प्रतिनिधित्व करतात. यातील अनेक मंदिरं ही हजारो वर्षांपूर्वीची आहेत. जी कोणत्याही धर्माचा शोध लागण्यापूर्वी बांधली गेली होती. ही मंदिरे प्रत्येक भारतीयाची आहेत, मग तो कोणत्याही धर्माचा वा विचारांचा असो.”

ही शरमेची बाब आहे
दक्षिण भारतातील मंदिरांच्या वाईट परिस्थितीबाबत खेद व्यक्त करत कंगनाने अजून एक ट्वीट करत असं लिहिलंय की – आपण आपली सभ्यता सोडून दिली आहे, हे पाहून अतिशय दुःख होत आहे. आपण आपला देश, संस्कृति आणि वारसा जपण्यासाठी काहीच करत नाही, ही आपल्यासाठी शरमेची बाब आहे. #FreeTNTemples’

याआधीही सद्‌गुरुंच्या मोहिमेस कंगनाने केला सपोर्ट
कंगनाने सद्गरुंच्या बाजूने सोशल मीडियावर आवाज उठविण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही तिने याच मुद्द्यावर ट्वीट केले होते. या आधी तिने तामिळनाडू सरकारकडे मंदिरांच्या मुक्तीसाठी अपील करत कंगनाने लिहिलं होतं, ”हिंदूंचे शोषण, दडपशाही आणि छळ संपविणे महत्त्वाचे आहे. आपली महान आणि जुनी सभ्यता जी हळूहळू लोप पावत आहे, ती जपण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. कंगनाने आपल्या या ट्वीटद्वारे असं आवाहन केलं आहे की. एका वेळी एक राज्य, एक मिस्ड कॉल द्या आणि तामिळनाडूची मंदिरे मुक्त करा, आपलं काम करा…

मंदिरांच्या मुक्तीसाठी सद्गुरुंची मोहिम
ईशा फाउंडेशनचे संस्थापक, आध्यामिक गुरु आणि सदगुरु अशी ओळख असलेले जग्गी वासुदेव हे तामिळनाडूतील मंदिरं शासनाच्या नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी एक मोहिम राबवत आहेत. हजारो मंदिरे आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आपली संस्क्‌ती आणि वारसा टिकवण्यासाठी आपण आत्ताच काहीतरी हालचाल केली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

सद्‌गुरू जग्गी वासुदेव यांनी तमिळनाडूमधील व्यथाच जगासमोर मांडली आहे. त्यांच्या सांगण्यानुसार तमिळनाडू राज्यातील सुमारे ११,९९९ मंदिरे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. याचे कारण म्हणजे तेथे प्रतिदिन पूजाच केली जात नाही! सुमारे ३४,००० मंदिरे अशी आहेत ज्यांना आपला कार्यभाग चालवण्याकरता वार्षिक दहा हजार रुपये इतकेच उत्पन्न प्राप्त होते. सुमारे ३७,००० मंदिरे अशी आहेत – जेथे पूजेपासून ते रक्षणापर्यंतची जबाबदारी ही केवळ एकाच व्यक्तीच्या हातामध्ये आहे! त्यामुळे येथील मंदिरांची परिस्थिती बिघडत चालली आहे. ही परिस्थिती सुधारण्यासीठी सरकारने मंदिरे भक्तांकडे सोपवावी, म्हणजे मंदिरांची पवित्रताही जपली जाईल आणि त्यांचा जीर्णोद्धारही केला जाईल. अशी मागणी सद्गुरूंनी तामिळनाडू सरकारकडे केली आहे. सद्‌गुरुंच्या या मागणीला कंगनाने सपोर्ट केलेला आहे.

पुरुषांच्या इंद्रियावर कमेंट करून दिया मिर्झाने माजवली खळबळ… (Dia Mirza’s Comment On Mens Private Part; People Surprised By Tweet)