कंगनाचा नवा चित्रपट : संक्रांतीची घोषणा (Kangan...

कंगनाचा नवा चित्रपट : संक्रांतीची घोषणा (Kangana Ranaut Announces Her New Film ON Makar Sankranti – Manikarnika Returns : The Legend of Didda)

विविध मुद्द्यांवरून वादग्रस्त ठरलेली कंगना रणौतने मकरसंक्रांतीच्या दिवशी आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. तिने झांशीची राणी लक्ष्मीबाई हा चित्रपट बनविला होता. आता ती काश्मीरच्या राणीच्या जीवनावर हा नवा चित्रपट निर्माण करणार असून ‘मणिकर्णिका रिटर्न्स-द लिजेंड ऑफ दिद्दा’ असे त्याचे नाव ठरविण्यात आले आहे. ही घोषणा करताना तिनं ट्वीट केलं आहे की, झांशीच्या राणीसारख्या शूरवीर वीरांगना आपल्या देशात निर्माण झाल्या आहेत. अशीच एक अप्रसिद्ध गाथा काश्मीरच्या राणीची आहे. तिने महमूद गजनवीला एकदा नव्हे दोनदा युद्धात हरविले आहे. कमल जैन यांच्यासह मी दिद्दाच्या जीवनावर चित्रपट घेऊन येत आहे.

स्वभावाने निडर असलेली कंगना स्वतःच एक योद्धा आहे. ती बोल्ड, बिनधास्त व सौंदर्यवती अभिनेत्री हिमाचल प्रदेशातील अंबाला शहराची आहे. सुट्टी पडली की तिथे जाते. ‘धाकड’ आणि ‘तेजस’ हे कंगनाचे आगामी चित्रपट असून तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री, लोकप्रिय नेत्या जयललिता यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात ती त्यांची भूमिका करीत आहे. तिची भूमिकांची निवड आणि लढाऊ वृत्तीमुळे ती बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींपेक्षा उठून दिसते.