कल्की कोचलिनचा बॉलिवूडसंदर्भात धक्कादायक खुलासा...

कल्की कोचलिनचा बॉलिवूडसंदर्भात धक्कादायक खुलासा(Kalki Koechlin’s Shocking Revelation About Bollywood)

आपल्याकडे अनेकांना गोऱ्या रंगाचं खूप कुतूहल असतं. टीव्हीवर दिसणाऱ्या कलाकारांप्रमाणेच आपण गोरेपान दिसावं यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न करत असतात. पण बॉलिवू़डमध्ये एका अभिनेत्रीच्या बाबतीत मात्र भलतच घडलं. तिला तिचा गोरा रंग करीअरमुळे नकोसा झालेला. आपल्या गोऱ्या रंगामुळे ठराविक भूमिकाच साकारायला मिळायच्या असा आरोप अभिनेत्री कल्की कोचलिन हिने केला आहे.

कल्कीने देव-डी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. कल्कीने लंडनमधून नाट्यशास्त्राचा अभ्यास केला होता. पण आपल्या गोऱ्या रंगामुळे तिला बॉलिवूडमध्ये वर्णभेदाचा सामना करावा लागला. सतत तिला गोरी मुलगी किंवा वरच्या वर्गातील मुलगी म्हणून गणले जाऊ लागले.

कल्कीने एका मुलाखतीत सांगितले की, एकदा एका दिग्दर्शकाने मला तुला शोभेल अशी चांगली भूमिका देतो असे मला म्हटले होते. पण त्याने मला एका मनोरुग्ण मुलीची भूमिका साकारायला दिली होती.

कल्की पुढे म्हणाली की माझी त्वचा जरी गोरी असली तरी माझं ह्रदय मात्र सावळं आहे. मी भारताला आणि बॉलिवूडला खरोखर माझं घर मानते. माझे बालपण दक्षिण भारतातील तमिळनाडूमध्ये गेले. देव डीमधील भूमिकेसाठी मी हिंदी भाषा शिकली.

मुलीच्या जन्मानंतर कल्की चित्रपट सृष्टीपासून काही काळ लांब होती. पण आता ती पुनरागमनासाठी सज्ज आहे. लवकरच ती गोल्डफिश या चित्रपटात दीप्ती नवलसोबत दिसणार आहे.