‘तान्हाजी’च्या भूमिकेसाठी अजय देवगण...

‘तान्हाजी’च्या भूमिकेसाठी अजय देवगणला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने काजोल झाली भावुक : ‘चित्रपटात तू होतीस म्हणून मिळाले हे यश’ – अजयने दिले तिला उत्तर (Kajol Shares Emotional Post After Tanhaji Bagging National Award, Ajay Devgn Reacts, ‘Your Presence In The Film Gave It An Added Dimension’)

६८ व्या राष्ट्रीय पुरस्कारात अजय देवगणला ‘तान्हाजी’ चित्रपटातील शूरवीर नायकाच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणे ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या त्याच्या चित्रपटास सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट म्हणून देखील हा बहुमान लाभला. त्यामुळे चाहते खुश झाले. अन्‌ काजोल फारच भावुक झाली.

या चित्रपटात काजोलने तान्हाजीची पत्नी सावित्रीची भूमिका केली आहे. आपल्या पतीच्या या यशाबद्दल तिने इन्स्टाग्राम आणि ट्वीटरवर पोस्ट शेअर केली. त्यात चित्रपटातील एका दृश्याचा फोटो टाकून ती म्हणते – टीम तान्हाजीने तीन राष्ट्रीय ॲवॉर्डस्‌ जिंकले. त्यामुळे मला खूप आनंद व अभिमान वाटतो आहे.

काजोलच्या या ट्वीटवर अजय म्हणतो – तुझे पण अभिनंदन! या चित्रपटात तू होतीस म्हणून त्याला वेगळे परिमाण लाभले!

अजयने चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट, अभिनेता आणि वेशभुषा असे ३ ॲवॉर्डस्‌ लाभले आहेत. त्यावर चाहत्यांच्या खूपच शुभेच्छा त्याला मिळत आहेत.