करोनापासून बचावण्याचे काजोलने दिले ५ कानमंत्र (...

करोनापासून बचावण्याचे काजोलने दिले ५ कानमंत्र (Kajol Shares 5 Rules For Staying Healthy In Covid Time, Netizens Shower Love On Actress)

सध्या संपूर्ण देशात कोविड -१९ साथीच्या रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंतेचे वातावरण आहे. एका मागोमाग एक अशा बॉलिवूड कलाकारांनाही करोनाची लागण झाल्याने चित्रसृष्टीतही चिंतेचे वातावरण आहे. या आजारावर मात करता यावी यासाठी या कलाकारांकडून लोकांमध्ये जागरुकता निर्माण केली जात आहे. करोनाविरुद्ध लढण्यासाठी सर्व नियमांचं पालन केलं जावं असं आवाहन केलं जात आहे. अभिनेत्री काजोलनेही पुढाकार घेत आपल्या मजेशीर शैलीने लोकांना करोनापासून बचावण्याचे ५ कानमंत्र दिले आहेत. जे लोकांना अतिशय आवडले असून, सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

काल ७ एप्रिलला जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून प्रत्येकजण आपापल्या परीने निरोगी राहण्यासाठीचे उपाय सांगत होते. त्याच मोहिमेत सहभागी होत काजोलनेही करोनाला पळवून लावण्यासाठीचे ५ सोपे उपाय सांगितले.

जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने काजोलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यात तिने पाच नियम सांगितले आहेत, शिवाय त्याचं अनुसरण केल्यास तुम्ही करोनापासून सुरक्षित राहाल, असंही तिनं म्हटलं आहे. तिच्या या पोस्टचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काजोलने ही पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये काजोल कारमध्ये बसलेली आहे आणि कारमधून बाहेर पाहत ती आपली पाच बोटं दाखवत आहे. या फोटोसोबत तिने असं लिहिलंय की,- आत्ताच्या परिस्थितीत निरोगी राहण्यासाठी ५ उपाय –

  • आपले दोन्ही हात आत ठेवा.
  • खिडकी वर करा.
  • कार चालवा.
  • घरी जा.
  • आता घरातून बाहेर पडू नका.

काजोल आपल्या या मजेशीर पोस्टमधून हेच सांगू इच्छिते की विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नका.

काजोलच्या या पोस्टला चाहत्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असून ते तिला हार्ट इमोटिकॉन शेयर करून आपलं प्रेम व्यक्त करत आहेत. कमेंट्‌सही करत आहेत. एका युजरला काजोलचा कानमंत्र सांगण्याचा अंदाज पसंत आला. या पोस्टसाठी तिला लाखो लाइक्स मिळाले आहेत.

काजोलच्या कामाबद्दल सांगायचे तर ती ‘तानाजी’ या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर अलीकडेच नेटफ्लिक्सच्या ‘त्रिभंग’ मधेही ती दिसली होती.