मुलगी न्यासाला ट्रोल करणाऱ्यांची काजोलने केली ब...

मुलगी न्यासाला ट्रोल करणाऱ्यांची काजोलने केली बोलती बंद- ट्रोल झाली तरच प्रसिद्ध होईल (Kajol reacts on daughter Nysa getting trolled online, Says- ‘If you are trolled, you are famous’)

स्टारकिड्स हे आपल्या आईवडीलांप्रमाणेच नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणांमुळे प्रकाशझोतात असतात. अशाच स्टार किड्सपैकी एक असलेली न्यासा देवगण आपल्या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओंमुळे अनेकदा चर्चेत असते. न्यासाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या ती चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर तिचे खूप फॅन फॉलोअर्स आहेत. अजय देवगण-काजोलची मुलगी न्यासा अनेकदा पार्टी आणि सहलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. न्यासाचे फोटो शेअर करताच लगेच व्हायरल होतात.

फोटोंवरुन न्यासाला अनेकदा ट्रोल केले जाते. आपल्या वडिलांच्या पैशांवर मजा मारणारी मुलगी म्हणून बरेच जण तिला ट्रोल करत असतात. काही युजर्स तिला अभ्यासाकडे लक्ष देण्याचा सल्लाही देतात. काही ट्रोलर्सही तिच्या लूक आणि ड्रेसवर अश्लील कमेंट करतात. यावर न्यासाची आई काजोलने प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या काजोल आपल्या ‘सलाम वैंकी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच मीडियाशी संवाद साधताना काजोलने न्यासाला ट्रोल करणाऱ्यांबद्दल सांगितले. ती म्हणाली की जेव्हा न्यासाबद्दल उलटसुलट गोष्टी केल्या जातात तेव्हा मला वाईट वाटते, परंतु मला हे देखील माहित आहे की ट्रोल करणे आता आयुष्याचा एक भाग बनला आहे. ती पुढे म्हणाली, “मला वाटते की ट्रोल करणे आता सोशल मीडियाचाही एक भाग बनला आहे. हे ऐकायला विचित्र वाटत असले तरी खरे आहे. तुम्ही ट्रोल झालात तर तुमची दखल घेतली जाते. जर तुम्ही ट्रोल होत असाल तर तुम्ही प्रसिद्ध व्हाल. जर तुम्ही ट्रोल झाला नाहीत तर तुम्ही प्रसिद्ध होणार नाही.

काजोल म्हणाली की ट्रोलिंगमुळे न्यासालाही त्रास होतो, “पण मी तिला समजावून सांगितले की नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी सकारात्मक बाजू पहा. जर एक व्यक्ती तुम्हाला सांगत असेल की तू खराब आहेस, आणि 10 हजार लोकांना वाटते की तू जगातील सर्वात सुंदर मुलगी आहेस तर तुला त्या दहा हजार लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे.

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेव. जेव्हा तुम्ही स्वतःला आरशात पाहता तेव्हा तुम्ही जे पाहता त्यावर विश्वास ठेवा.” काजोलने असेही सांगितले की 100 पैकी फक्त 2 लोक नकारात्मक शब्द बोलतात आणि दुर्दैवाने फक्त तेच लोक हायलाइट केले जातात.

न्यासा देवगणचे नवीन फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचा बदललेला लूक आणि स्टाइल पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. लोक न्यासाच्या ट्रान्सफॉर्मेशन लुकचे कौतुक करत असले तरी काही युजर्सनी तिला प्लास्टिक सर्जरी केल्याचे सांगून ट्रोल करत आहे.