काजोलची फिल्म इंडस्ट्रीमधील ३०वर्षे झाली पूर्ण,...

काजोलची फिल्म इंडस्ट्रीमधील ३०वर्षे झाली पूर्ण, पती अजय देवगनने फोटो शेअर करत लिहिली खास पोस्ट…. काजोलने चाहत्यांना म्हटले – ३० वर्षांकरीता चीयर्स … (Kajol Completes 30 Years In Cinema, Husband Ajay Devgn Pens A Special Note, Kajol Says- Cheers To 30 Years)

सुपर टॅलेंटेड काजोल देवगण (Kajol devgn) ने बॉलीवूडमध्ये ३० वर्षे पूर्ण केली आहेत. १९९२ मध्ये काजोलने बेखुदी चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. किशोरवयीन काजोलला पाहून अनेकांना वाटलं की या मुलीमध्ये काहीतरी खास आहे. काजोलने तिच्या टॅलेंटच्या जोरावर लोकांचे हे म्हणणे सिद्ध करून दाखवले. तिने आतापर्यंतच्या तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

या खास प्रसंगी पती अजय देवगणनेही एक खास पोस्ट शेअर करत काजोलला शुभेच्छा दिल्या आहेत. अजयने तानाजी : द अनसंग वॉरियर या चित्रपटातील एक चित्र शेअर केले आणि लिहिले – ३ दशके सिनेमात… आणि तू खरोखरच अप्रतिम काम केले आहे, आग लावली आहे. खरे सांगायचे तर, ही तर एक सुरुवात आहे पुढे येणाऱ्या संधींसाठी, चित्रपट आणि आठवणींसाठी …

चाहत्यांनीही या पोस्टला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. सर्वजण कमेंट बॉक्समध्ये हार्ट इमोजी पोस्ट करून काजोलचे अभिनंदन करत आहेत.

दुसरीकडे, काजोलने तिच्या इन्स्टा पेजवर एक रील देखील शेअर केली आहे… ज्यामध्ये तिच्या चित्रपटांच्या नावांसह तिचे लोकप्रिय लूक आहेत. काजोलने लिहिले आहे- काल मला कोणीतरी विचारले होते की मला कसे वाटते? लोकांनी माझ्यावर निःस्वार्थीपणे जे प्रेम केले त्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. याशिवाय मी शब्दात वर्णन करू शकत नाही. तर ३० वर्षांसाठी चिअर्स… मोजणे सुरू ठेवा… देवाची इच्छा असेल तर आणखी ३० वर्षे मिळतील…

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम