‘सलाम वेंकी’ च्या शूटिंग दरम्यान काजोल झाली भाव...

‘सलाम वेंकी’ च्या शूटिंग दरम्यान काजोल झाली भावूक….. (Kajol Became Very Emotional During The Shooting Of ‘Salaam Venky’, The Actress Told The Reason)

बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या तिच्या आगामी ‘सलाम वेंकी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या ९ डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत काजोल आणि चित्रपटाची टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये पूर्णपणे व्यस्त आहे. सुरुवातीला काजोलने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता, पण नंतर तिने होकार दिल्याचे सांगितले जाते. हा चित्रपट रेवतीने दिग्दर्शित केला आहे.

काजोल आणि विशाल जेठाना यांचा हा चित्रपट प्रसिद्ध बुद्धिबळपटू कोलावेन्नू व्यंकटेश यांच्या खऱ्या जीवनावर आधारित आहे. कोलावेन्नू व्यंकटेश मांसपेशींशी संबंधित ड्यूचेन मस्कुलर डिस्ट्रॉफी नावाच्या आजाराने ग्रस्त होते. २००४ मध्ये त्यांचे निधन झाले. काजोल म्हणते की, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती इतकी भावूक झाली होती की, तिने ग्लिसरीनच्या मदतीशिवाय बहुतेक दृश्यांचे शूटिंग पूर्ण केले.

काजोलने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, “हा चित्रपट त्याच्या विषयाची जाणीव करुन घेतल्याशिवाय करणे अशक्य होते. मला खात्री नव्हती की मला हा चित्रपट करायचा आहे; कारण हा असा विषय आहे जो प्रत्येकासाठी वाईट स्वप्नासारखा आहे. याला हो म्हणणं माझ्यासाठी खूप कठीण होतं.

याशिवाय चित्रपटाच्या दिग्दर्शनाबद्दल काजोल म्हणाली, “रेवतीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तिने आम्हाला चित्रपटात काम करणे खूप सोपे केले, कारण आम्ही दिवसभर एकाच वातावरणाच्या चौकटीत होतो. याशिवाय ‘सलाम वेंकी’ची स्क्रिप्ट खूप सुंदर लिहिली आहे. हा जीवनाचा उत्सव आहे आणि हा चित्रपट तुम्हाला शिकवतो की जीवन हा एक उत्सव असला पाहिजे.”

आम्ही तुम्हाला सांगतो की ड्यूकेन मस्क्यूलर डिस्ट्रॉफी हा एक अनुवांशिक विकार आहे, ज्यामुळे हृदय आणि मेंदूतील स्नायू कमकुवत होतात आणि अतिशय गंभीर स्थिती निर्माण होते. व्यंकटेशच्या मृत्यूनंतर असा आजार असणाऱ्या व्यक्तीस देशात इच्छामरण देण्याबाबत देशात चर्चा रंगली होती. याबाबत काजोलला विचारले असता ती म्हणाली की, कोणालाही सन्मानाने जगण्याचा आणि मरण्याचा अधिकार आहे.

मुलाखतीत पुढे काजोल म्हणाली, “माझे याविषयी दुमत आहे, इतर कोणत्याही कारणामुळे नाही तर आपल्याला माणुसकी माहीत आहे आणि असे अनेक लोक आहेत जे अशा कायद्यांचा फायदा घेऊ शकतात. नक्कीच विचार करण्यासारखे आहे.”

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम