काजोल आणि अजय देवगणची लेक न्यासा झाली १८ वर्षां...

काजोल आणि अजय देवगणची लेक न्यासा झाली १८ वर्षांची, अभिनेत्याने खास पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा! (Kajol And Ajay Devgn’s Daughter Nysa Turn 18 Actor Share Special Post On Social Media)

बॉलिवूडचा ‘सिंघम’ अर्थात अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची लेक न्यासा हिचा आज १८वा वाढदिवस आहे. आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजयने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अजयने न्यासाबरोबर एक फोटो शेअर केला आहे. आपल्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अजयने खास आशीर्वाद मागितला आहे. तथापि, हा आशीर्वाद केवळ न्यासासाठी नसून प्रत्येकासाठी आहे, असंही त्याने म्हटलं आहे.

अजयने फोटो शेअर करत लिहिले की, ‘हॅपी बर्थडे न्यासा, अशा कठीण काळात अशा छोट्या आनंदानं संपूर्ण टेन्शन कमी केलं. या व्यतिरिक्त ज्यांना या टेन्शनमधून बाहेर पडण्याची गरज आहे, अशा सर्वांसाठी मी प्रार्थना करतो.’ आपल्या मुलीच्या वाढदिवशी त्याने प्रत्येकासाठी प्रार्थना केली आहे. चाहत्यांनीही अजयच्या या पोस्टचे कौतुक केले आहे.

पाहा अजय देवगणची पोस्ट

न्यासाचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले आहेत. बऱ्याच वेळा न्यासाला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. अजय एकदा या विषयावर माध्यमांना म्हणाला होता की, ‘माझी विनंती आहे की मुलांना एकटे सोडा. जर पालक सेलिब्रेटी असतील तर, मग मुलांनी नुकसान का सहन करावे? मुलांना त्यांची स्वतःची वैयक्तिक स्पेस द्या.’ न्यासा सध्या सिंगापूरमध्ये शिक्षण घेत आहे. काजोल देखील न्यासाबरोबर सिंगापूरमध्ये राहत आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम