कंगना रणौतने ट्विटरवरून पुन्हा एकदा बॉलिवूड कला...
कंगना रणौतने ट्विटरवरून पुन्हा एकदा बॉलिवूड कलाकारांना सुनावले खडे बोल… म्हणाली,“लग्नांमध्ये डान्स करणं आणि रात्री बोलवल्यानंतर अभिनेत्यांच्या रुममध्ये जाणं…” (Kagana Ranaut Target To Bollywood Celebrity Who Dance In Wedding And Item Numbers)

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या ट्वीटमुळे चर्चेत असलेली पाहायला मिळते. आताही ती तिच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आली आहे. नेहमीच बिनधास्तपणे आपली मतं मांडणाऱ्या कंगनाने आता पुन्हा एकदा बॉलिवूडकरांना खडे बोल सुनावले आहेत.
कंगनानं ट्वीट करत लिहिलं आहे की- ”कृपया हे लक्षात घ्या की माझी आई माझ्यामुळे श्रीमंत नाही झाली. मी एका राजकीय, व्यावसायिक, उत्तम नोकरदार घराण्यातून आले आहे. माझी आई गेल्या २५ वर्षांपासून एक शिक्षिका आहे. फिल्म माफियांना याविषयी माहिती असायला हवं की माझ्यात इतका आत्मसन्मान कुठून आला. मी त्यांच्यासारख्या खालच्या दर्जाच्या हरकती करत नाही किंवा कोणत्या लग्नात नाचून पैसे कमावत नाही”.
कंगना रणौतने कोणत्याही बॉलिवूड कलाकाराचं नाव घेतलेलं नाही. मात्र त्यांना भिकारी माफिया म्हटलं आहे. तिने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, “भिकारी फिल्म माफियांना माझा आत्मसन्मान म्हणजे अहंकार वाटतो. कारण मी दुसऱ्या अभिनेत्रींप्रमाणे त्यांच्यासमोर हात पसरत नाही.”
Bhikhari film mafia ne mere attitude to mera arrogance kaha, kyunki main dusari ladkiyon ki tarah giggle karna, item number karna, shaadiyon pe nachna, raat ko bulaaye jaane pe heros ke kamron mein jana yeh sab keliye saaf mana kiya, they declared me mad and tried to jail me1/2
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 27, 2023
याच ट्वीटमध्ये कंगना पुढे लिहिते, “कामासाठी चित्रपटांमध्ये आयटम नंबर करणं, लग्नांमध्ये डान्स करणं आणि रात्री बोलवल्यानंतर अभिनेत्यांच्या रुममध्ये जाणं. या सर्व गोष्टींना मी स्पष्ट शब्दांत नकार दिला. तर त्यांनी मी वेडी असल्याचं घोषित केलं. मला तुरुंगात पाठवण्याचाही प्रयत्न केला. हा गर्विष्ठपणा आहे की प्रामाणिकपणा. स्वतःला सुधारायचं सोडून मला सुधारायला निघालेत”.
Is this attitude or integrity? Khud ko sudharne ki jageh woh mujhe sudharna chale hain, lekin chakkar yeh hai ki mujhe apne liye kuch bhi nahi chahiye, maine abhi apna sab girvi rakh ke ek film banayi hai, rakshashon ka safaya hoga heads will roll, no one should blame me 🙏
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 27, 2023
दरम्यान कंगना रणौतच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांच्या तुफान प्रतिक्रिया आल्या आहेत. या ट्वीटमधून तिने बॉलिवूडच्या आघाडीच्या कलाकरांना खडे बोल सुनावल्याचं बोललं जात आहे. कारण काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार, सलमान खान यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकार दिल्लीतील एका लग्नात सहभागी झाले होते आणि या लग्नात त्यांनी डान्सही केला होता ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
ती म्हणते, ”पण गोष्ट अशी आहे की मला स्वतःसाठी काही नकोय. मी आता माझी सगळी संपत्ती गहाण ठेवून एक सिनेमा बनवला. राक्षसांचा एका फटक्यात मी सर्वनाश करणार आणि कोणीही मला दोष देणार नाही”.

या ट्वीटमुळे काही लोक तिला ट्रोल करताना दिसत आहेत तर काही लोक तिला तिच्या जुन्या दिवसांची आठवण करून देत आहेत. कंगनाच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं झालं तर कंगनाचा ‘धाकड’ सिनेमा नुकताच भेटीस येऊन गेला. या सिनेमाच्या अपयशानं कंगनाला मोठा धक्का बसला. तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी बोलायचं झालं तर कंगना ‘तेजस’,’टीकू वेड्स शेरू’, इमरजन्सी’ आणि ‘चंद्रमुखी २’ सिनेमात दिसणार आहे.
(फोटो सौजन्य- कंगना रणौत इन्स्टाग्राम)