‘कभी ईद कभी दिवाली’च्या सेटवरुन शहनाज गिलचा फोट...

‘कभी ईद कभी दिवाली’च्या सेटवरुन शहनाज गिलचा फोटो झाला लीक, अभिनेत्रीसोबत दिसली बालकलाकार(Kabhi Eid Kabhi Diwali: New pic of Shehnaaz Gill LEAKED from sets?)

सलमान खानचा ‘कभी ईद कभी दिवाली’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. चित्रपटाची तयारी जोरदार सुरु असून बिग बॉस फेम शहनाज गिलचा फोटो समोर आला आहे. तो फोटो चित्रपटाच्या सेटवरुन लीक झाल्याचे म्हटले जाते. या फोटोत शहनाजसोबत एक बालकलाकारसुद्धा दिसत आहे.

व्हायरल होत असलेला फोटो पाहून तो ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाच्या सेटवरील असल्याचे म्हटले जाते. फोटोत शहनाजच्या पाठी एसकेएफचे टीशर्ट घालून क्रू मेंबर्स दिसत आहे.

बिग बॉस शोची स्पर्धक असलेली शहनाज या चित्रपटात अभिनेता जस्सी गिलच्या विरुद्ध दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता आयुष शर्माने मेकर्ससोबत मतभेद झाल्याने हा चित्रपट सोडल्याचे म्हटले जाते.

व्हायरल झालेला शहनाजचा फोटो पाहून तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. ट्विटरवर कमेंट करत एकाने लिहिले की , तुम्ही शहनाजचा फोटो पाहिलात, कभी ईद कभी दिवालीच्या सेटवरुन लीक झाला आहे का ? शेवटी अनऑफिशियल अनाउंसमेंट झालीच.

लीक झालेल्या फोटोवर शहनाज आणि सलमानकडून अजून कोणत्याही प्रकारचा खुलासा करण्यात आलेला नाही. याशिवाय या चित्रपटात श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीदेखील दिसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे नाव कभी ईद कभी दिवाली हे बदलून पुन्हा ‘भाईजान’ करण्यात आले आहे.