‘तू फक्त माझीच राहा’ असं म्हणत अर्ज...

‘तू फक्त माझीच राहा’ असं म्हणत अर्जुन कपूरने आपली प्रियतमा मलायका अरोराला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! (Just be mine…’ Writes Arjun Kapoor As He Wishes His Lady Love On Her Birthday, Malaika Reacts- ‘only yours’)

टपून बसलेल्या छायाचित्रकारांची आवडती मॉडेल आणि ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा आज आपला ४९ वा वाढदिवस साजरा करते आहे. त्या निमित्ताने तिला मित्रपरिवार आणि बॉलिवूडच्या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्यात. पण तिचा जीवलग अर्जुन कपूरने ज्या रोमॅन्टिक पद्धतीने तिला विश केलं आहे, त्यामुळे मलायकाचा वाढदिवस सुपर स्पेशल झाला आहे.

मलायका-अर्जुन हे बॉलिवूडचे सर्वाधिक रोमॅन्टिक आणि सुंदर जोडपे आहे. आपले प्रेमसंबंध अधिकृतरित्या जाहीर केल्यानंतर ते विविध समारंभात आणि सोशल मीडियावर एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात.

अर्जुनने मलायकाच्या वाढदिवशी आधी तिला विश केले आहे. नंतर इन्स्टाग्राम अकाऊंटवर मलायकासोबत घेतलेली एक मिरर सेल्फी प्रसिद्ध केली आहे. त्यात तो मलायकाकडे प्रेमभराने पाहतो आहे. शिवाय दोघे एकदम रोमॅन्टिक दिसत आहेत.

या फोटोसोबत अर्जुनने लिहिलं आहे की, ‘हॅपी बर्थ डे बेबी. तू जशी आहेस तशीच राहा. खुश राहा. फक्त माझीच राहा.’

मलायकाने पण उत्तरादाखल आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर लिहिलं – ‘फक्त तुझीच…’

मलायका-अर्जुनची ही रोमॅन्टिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते मलायकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.