जॉन अब्राहमच्या निर्लज्जपणाचा कळस, त्याने शेअर ...

जॉन अब्राहमच्या निर्लज्जपणाचा कळस, त्याने शेअर केले न्यूड फोटो (John Abraham Shares Nude Photos, Fans Ask ‘Bhai Kapde?’)

सोशल मीडियावर आपले लक्ष वेधून घेण्यासाठी बॉलिवूड स्टार्स काय करतील त्याचा नेम राहिला नाही. या स्पर्धेत जॉन अब्राहमने आपले न्यूड फोटो शेअर करून निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. या फोटोंमध्ये जॉन सोफ्यावर निर्वस्त्र बसला आहे. अन्‌ लाजेरवाणेखातर त्याने मांडीवर उशी ठेवली आहे. त्याच्या या निलाजऱ्या कृतीवर चाहत्यांनी मजेशीर कमेंटस्‌ केल्या आहेत.

असा नग्न फोटो टाकून अब्राहम लिहितो – ‘ # वॉर्डरोब के इंतजार में # सेट लाइफ’ त्याचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. त्यामध्ये त्याने मिस्कील स्माईल दिले आहे. फोटोमध्ये त्याची बांधेसूद शरीरयष्टी दिसते आहे. त्यावरून चाहते विचारताहेत – आप कैसे फिट रहते हो?

जॉन अब्राहमच्या या फोटोंची त्याचे फॅन्स आणि फॉलोवर्स चांगलीच प्रशंसा करत आहेत. काही युजर्सनी फायरचा तर काहींनी लव्ह वाला इमोजी टाकला आहे. एक यूजर विचारतोय – भाई कपडे? तर दुसरा म्हणतो – नाही हं जॉन, दिवस असा सुरू होत नसतो.

‘एक व्हिलन २’ या चित्रपटाच्या शूटिंगला जॉनने या आठवड्यात सुरूवात केली आहे. मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटात जॉन बरोबर तारा सुतारिया, दिशा पटनी आणि अर्जुन कपूर आहेत.

अर्जुन कपूरच्या ‘सरदार का पोता’ मध्ये देखील जॉन दिसेल. जो लवकरच नेटफ्लिक्स वर झळकेल. याशिवाय ‘मुंबई सगा’ हा जॉन अब्राहमचा आगामी चित्रपट असून त्यात त्याची दमदार भूमिका आहे. सदर चित्रपट १९ मार्चला थिएटर्समधून प्रदर्शित होईल. तर त्याचा ‘सत्यमेव जयते’ हा आणखी एक चित्रपट सलमान खानच्या ‘राधे’ या चित्रपटासोबत ईदच्या दिवशी प्रदर्शित होईल.

जॉन अब्राहम आपल्या फिटनेसबाबत अतिशय जागरूक आहे. व्यायाम करतानाचे आपले अर्धनग्न फोटो तो अधूनमधून इन्स्टाग्राम वर शेअर करत असतो. तो एकही दिवस आपला व्यायाम करणे सोडत नाही.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम