पुण्यात गाजलेल्या जोशी- अभ्यंकर भीषण हत्याकांडा...

पुण्यात गाजलेल्या जोशी- अभ्यंकर भीषण हत्याकांडावर जिओ स्टुडिओजची वेब सिरीज(Jio Studios To Release Web Series Jakkal On The Horrified Murder case of Pune)

जिओ स्टुडिओज लवकरच ‘जक्कल’ नावाची मराठी वेबसीरिज घेऊन येत आहेत. १९७० च्या दशकात पुण्यात घडलेल्या खळबळजनक हत्याकांडावर आधारित हा वेब शो असून सामान्य मध्यमवर्गातील मुलं कळत नकळतपणे जेव्हा गुन्हेगारीच्या मार्गावर वळतात आणि ते कोणत्या टोकाला जाऊ शकतात याचा शोध घेणारी ही मालिका असणार आहे.

दिग्दर्शक विवेक वाघ यांची ही संकल्पना असून ते गेले ४ वर्षांपासून या विषयावर काम करत आहेत. विवेक वाघ यांना २०२० मध्ये याच विषयावर आधारित ‘बेस्ट इन्वेस्टिगेटिव्ह डॉक्युमेंट्री’ (Best Investigative Documentary) हा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. या मालिकेची निर्मिती ए कल्चर कॅनव्हास एंटरटेनमेंट प्रोडक्शनचे शिवम यादव आणि कार्तिकी यादव यांनी केली आहे.

या निमित्ताने बोलताना दिग्दर्शक विवेक वाघ म्हणाले “1976 ते 1977 ह्या काळात पुण्यासारख्या पेन्शनर आणि सांस्कृतिक शहरात दोन आणीबाणी लागू झाल्या एक दिल्लीची आणि दुसरी जक्कलची.

आणि म्हणूनच खळबळजनक हत्याकांड, क्रूर हत्या ह्या पलीकडे काय आहे जक्कल? जक्कल हे आडनाव आहे का ही वृत्ती ? आणि या मध्ये अडकलेल्या त्या १० निरपराध लोकांचं काय?

महत्वाचं म्हणजे एक कलाकार खुनी होता का एक खुनी दुर्देवीने कलाकार होता, ह्याचा धांडोळा जक्कल या मालिकेत करण्याचा प्रयत्न असणारं आहे.”

फार वर्षांपूर्वी याच विषयावर ‘माफीचा साक्षीदार’ हा चित्रपट आलेला. त्या चित्रपटात जक्कलची भूमिका नाना पाटेकर यांनी साकारली होती. त्यावेळी नाना पाटेकर हे एक होतकरू अभिनेता होते.