पर्यावरण रक्षणासाठी ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिक...

पर्यावरण रक्षणासाठी ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील जीजी आक्काचा पुढाकार (Jiji Akka Of ‘Phulala Sugandha Maticha’ Takes Lead In Conservation Of Environment)

निसर्गाने आपल्याला भरभरुन दिलंय. त्याचं हे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी आता आपण सर्वांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील कलाकारांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतलाय.

जीजी अक्का म्हणजेच अभिनेत्री अदिती देशपांडे यांच्या पुढाकाराने सेटवरच्या प्लास्टिक बाटल्यांचा टाकाऊ पासून टिकाऊ वापर करण्यात येत आहे. सेटवर पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या एकत्र जमा केल्या जातात. अदिती ताई या रिकामी बाटल्या दादर मधली गल्ली येथील ग्रीन इनिशिएटीव्ह या संस्थेला देतात. प्लास्टिकच्या या निरुपयोगी बाटल्यांपासून इंधन निर्मिती केली जाते किंवा बागेत सुशोभीकरणासाठी वापरल्या जातात.

गेले वर्षभर अदितीताई हा उपक्रम सेटवर राबवत आहेत. अदिती ताईंच्या या उपक्रमाला फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील सर्वच कलाकार सहाय्य करत असून पर्यावरण रक्षणासाठी झटत आहेत. फुलाला सुगंध मातीचा मालिकेच्या सेटवरचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.