जितेन्द्र जोशीला उत्कृष्ट अभिनेत्याचे सिल्वर पि...

जितेन्द्र जोशीला उत्कृष्ट अभिनेत्याचे सिल्वर पिकॉक पारितोषिक (Jeetendra Joshi Bags Silver Peacock Award, As The Best Actor)

अभिनेता जितेन्द्र जोशी, याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून, गोवा येथे भरलेल्या ५२ व्या ‘इफ्फी’ मध्ये सिल्वर पिकॉक अवॉर्ड ऍवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटातील निशिकांत कामत हे गुंतागुंतीचे पात्र समर्थपणे वठविल्याबद्दल  जितेन्द्रचा गौरव करण्यात आला. निखिल महाजन दिग्दर्शित या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांची पसंती लाभली होती. म्रुत्युकडे वाटचाल करणाऱ्या एका श्रीमंत जमीनदाराची कहाणी ‘गोदावरी’ मध्ये चित्रित करण्यात आली आहे. मृत्यू जवळ आलेला कळल्यावर या पत्राचा जन्म-मृत्यू मधील तात्विक संघर्षाची कथा या चित्रपटात आहे.

निशिकांत कामतच्या भूमिकेत जितेन्द्र जोशीने आवेशयुक्त कामगिरी केली आहे. ही भूमिका गुंतागुंतीची असली तरी, संतापापासून ते अश्रूपर्यंतचा त्याचा अभिनय प्रवास नदीच्या प्रवाहासारखा आहे, असे आपले मत परीक्षकांनी जीतेन्द्रच्या कामगिरीबद्दल नोंदवले आहे.
मराठी चित्रसृष्टीत अभिनेता, कवी, लेखक म्हणून जीतेन्द्र जोशी नावाजलेला आहे.
– नंदकिशोर धुरंधर