सूनबाई ऐश्वर्या रायच्या चौकशीवरून, जया बच्चनचा ...

सूनबाई ऐश्वर्या रायच्या चौकशीवरून, जया बच्चनचा राज्सभेत भडका उडाला; उच्चारली शापवाणी! (Jaya Bachchan Looses Cool Amid Aishwarya Rai’s Questioning In Panama Papers Case)

पनामा पेपर लिकच्या (Panama Papers Case) संदर्भात ऐश्वर्या राय बच्चनला काल अंमलबजावणी संचालनालय (ईडी) समोर हजर राहावे लागले. या लोकांनी तिची ५ तास कसून तपासणी केली.

Jaya Bachchan

या चौकशीवरून तिची सासू जया बच्चनच्या अंगाचा तीळपापड झाला. ती राज्यसभेत इतकी भडकली की, सहयोगी खासदारांना शाप देऊ लागली. जयाचा हा भडका उडाल्याचा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे.

पनामा पेपर लिकच्या संदर्भात ऐश्वर्याची चौकशी केल्याप्रकरणी जया राज्यसभेच्या सभागृहात फारच संतप्त झाली. आपल्या विरुद्ध पर्सनल कमेन्टस्‌ केल्याचा आरोप तिनं लावला. संतापाच्या भरात जया बच्चन बोलली, या सभागृहात ही माणसे खासगी टीका कशी काय करू शकतात? तुमचेही वाईट दिवस येतील. हा माझा शाप आहे!”  जया बच्चन वर कोणती पर्सनल कमेन्ट केली होती, ती कोलाहलात ऐकू आली नाही. मात्र रागाच्या भरात जयाने जे आकांडतांडव केले त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jaya Bachchan

ऐश्वर्या रायची ईडी विभागाने जी चौकशी केली, त्यानंतर काही तासातच जयाने हे आकांडतांडव केले आहे. त्यामुळे लोक तिच्या या वागण्याचा संबंध सूनबाईच्या चौकशीशी जोडत आहेत. अन्‌ जयाची टर उडवत आहेत. काही मीम्स पण प्रसिद्ध केले जात आहेत.