जय भानुशाली – माही विज यांच्या स्वयंपाक्य...

जय भानुशाली – माही विज यांच्या स्वयंपाक्याने दिली जीवे मारण्याची धमकी , केली शिवीगाळ : माही म्हणते- मुलीची काळजी वाटते. (Jay Bhanushali-Mahhi Vij’s cook threatens to kill them, hurls abuses; actress says, I am scared for my daughter)

टीव्हीवरील सर्वांची आवडती जोडी माही विज आणि जय भानुशाली हे सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. ते सतत फोटो , व्हिडीओ पोस्ट करुन चर्चेत राहतात. पण सध्या या जोडीबद्दल वेगळीच बातमी समोर आली आहे. जय-माहीच्या घरातील नोकराने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामु्ळे जय आणि माही त्यांच्या मुलीसाठी खूप चिंतेत आहेत.

याप्रकरणी 30 जूनला जय-माहीने पोलिसांत तक्रार नोंदवली. या तक्रारीत, त्यांच्या नोकराने त्यांना व त्यांच्या दोन वर्षांच्या लहान मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली असे म्हटले आहे. माहीने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट सुद्धा टाकल्या होत्या पण काही वेळाने तिने त्या सगळ्या पोस्ट डिलीट केल्या.

माहीने याबाबतची माहिती स्वत: सांगितली, ती म्हणाली की त्यांच्या घरात तीन दिवसांपूर्वीच नवीन नोकर कामाला ठेवला होता. पण तो चोरी करत असल्याचे आमच्या लक्षात आले. जय घरी आल्यावर मी त्याला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा जयने त्याचा तीन दिवसांचा हिशोब चुकता केला पण त्याला पूर्ण महिन्याचा पगार हवा होता. जयने तो देण्यास नकार दिल्यावर त्याने पगार दिला नाही तर 200 बिहारी तुम्हाला मारायला घेऊन येईन अशी धमकी दिली. नशेत असल्यामुळे तो आम्हाला शिवीगाळ ही करत होता. त्याने आम्हाला चाकूने मारण्याची धमकी दिलीच पण सोबत आमची दोन वर्षांची लहान मुलगी ताराला खंजीर खोपसून मारण्याची धमकी दिली.

माहीने पुढे सांगितले की, याबाबत आम्ही पोलिसांत तक्रार केली होती. मला काही झाले तरी मला फरक पडत नाही पण माझ्या मुलीसाठी मला खूप भीती वाटतेय. पोलिसांनी त्या नोकराला अटक केली पण नंतर त्याला जामीनावर सोडण्यात आले.

नोकर जामीनावर सुटल्यामुळे माही खूप घाबरली आहे. तिची भीती व्यक्त करताना ती म्हणाली, जेव्हा आम्ही पोलिस स्टेशनला गेलो तेव्हा तो मला सतत फोन करत होता. माझ्याकडे त्या सगळ्या कॉल रेकॉर्डिंग्स आहेत. सध्या सगळीकडे इतक्या साऱ्या भयंकर गोष्टी घडत आहेत की त्या नुसत्या ऐकूनच खूप भीती वाटते. मला त्याने मारायचा प्रयत्न केला तर लोक त्यासाठी निषेध करतील पण माझ्या कुटुंबाचे काय ? मी माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी खूप चिंतेत आहे. तो जामीनावर सुटल्याचे मला समजले आहे त्यामुळे तो खरंच लोकांना आमच्या घराबाहेर घेऊन आला आणि आम्हाला टार्गेट केले तर… या धमकी प्रकरणामुळे जय आणि माही खूप घाबरले आहेत.