‘वागले की दुनिया’ चे जावेद अख्तर या...

‘वागले की दुनिया’ चे जावेद अख्तर यांनी केलेले कौतुक (Javed Akhtar Has All Praise For ‘Wagle Ki Duniya’ On Its First Anniversary)

सोनी सब चॅनलवरील ‘वागले की दुनिया नयी पिढी नये किस्से’, या मजेदार कॊटुंबिक मालिकेने एक वर्ष पूर्ण केले. त्या निमित्ताने ज्येष्ठ गीतकार व लेखक जावेद अख्तर यांनी मालिकेचे कौतुक करणारा खास व्हिडीओ सादर केला आहे.

सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्या कल्पनेतून निर्माण झालेल्या या मालिकेचे आधुनिक रूपांतर सादर केले जात असून त्यामध्ये अंजन श्रीवास्तव, भारती आचरेकर व सुमीत राघवन आणि परिवा प्रणती  या कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

मालिकेने वर्ष पूर्ण केले, त्या प्रसंगी जावेद अख्तर म्हणतात, “जीवनाचे सार दाखवणारी ही मालिका मनोरंजक व सामाजिक प्रभाव निर्माण करते. वास्तविक जीवनाशी संबंधित अनेक कथा इतर कोणती मालिका दाखवत असेल, असं मला वाटत नाही. आपले सूक्ष्म पण लक्षणीय कथानक आणि पात्रांच्या माध्यमातून टी.व्ही. चा दर्जा वाढवण्यात ही मालिका यशस्वी ठरली आहे.