समुद्रकिनारी बोल्ड अवतारात बागडणारी जान्हवी कपू...

समुद्रकिनारी बोल्ड अवतारात बागडणारी जान्हवी कपूर (Janvhi Kapoor Flaunts Her Bold Look In The Ocean)

दिवंगत  श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर सोशल मीडियावर आपला ग्लॅमरस अवतार असा सादर करते की , तिचे चाहते फिदा होतात. तिच्या या जादुभऱ्या पोस्टची ते वेड्यासारखी वाट पाहत असतात. ‘धडक’ या चित्रपटातून तिनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे. पण आता तिनं बोल्ड अवतारात समुद्रकिनारी बागडत असताना व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Janvhi Kapoor, Bold Look In The Ocean

स्वीमसूट घातलेला हा व्हिडीओ काही सेकंदाचा आहे. पण निळ्या आभाळाखाली सिल्वर स्वीमसूट  घातलेली जान्हवी , जणू जलपरी असल्याचा भास होतो आहे. या चांदीसारख्या चमकणाऱ्या सूटमध्ये ती आपल्या केसांमधून पाणी शिंपडताना दिसते आहे. ते पाहून चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. जान्हवीच्या या व्हिडीओने इंटरनेटचा पारा चढवला आहे.

Janvhi Kapoor, Bold Look In The Ocean

त्यावर एका चाहत्याने लिहिलंय – लव्ह यू बेबी. कित्येक चाहत्यांनी तिला जलपरी म्हटलं आहे. तर काही लोकांनी फायर आणि हार्टचे इमोजी शेअर करून जान्हवीच्या हॉट लूकची तारीफ केली आहे. जान्हवीचा  ‘धडक’ हा चित्रपट तिची आई श्रीदेवीच्या निधनानंतर रिलीज झाला होता. नंतर ती ‘रुही ‘ मध्ये दिसली होती. ‘दोस्तांना २’ आणि ‘गुडलक जेरी’, हे तिचे आगामी चित्रपट आहेत.

Janvhi Kapoor, Bold Look In The Ocean