जन्माष्टमी स्पेशल : भगवान श्रीकृष्णाची भूमिका क...

जन्माष्टमी स्पेशल : भगवान श्रीकृष्णाची भूमिका करून, घराघरातून लोकप्रिय झालेले टी. व्ही. कलाकार (Janmashtami Special : Actors Who Played Lord Krishna On T.V. And Became Popular)

आज संपूर्ण देश कृष्ण जन्माष्टमीचा सण भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा करत आहे. टेलिव्हिजनवरील कार्यक्रमांमध्ये अनेक वेळा श्रीकृष्ण दिसले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्यांविषयी सांगत आहोत, जे भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारून घरोघरी लोकप्रिय झाले.

सर्वदमन डी बनर्जी

Janmashtami , Actors Who Played Lord Krishna On T.V

रामानंद सागर यांची ‘कृष्णा’ ही मालिका टेलिव्हिजनवर खूप गाजली. प्रत्येक वयोगटातील, प्रत्येक वर्गातील लोकांना ही मालिका आवडली. सर्वदमन डी बॅनर्जी या मालिकेत भगवान कृष्णाच्या भूमिकेत दिसले होते. लोकांना श्रीकृष्णाच्या भूमिकेत ते इतके आवडले की आजही ते फक्त भगवान कृष्णाच्या भूमिकेसाठीच ओळखले जातात. त्यांनी १९८३ चा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘आदि शंकराचार्य’ आणि ‘स्वामी विवेकानंद’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले असले तरी भगवान कृष्णाची भूमिका ही त्यांची ओळख बनली.

नितीश भारद्वाज

Janmashtami , Actors Who Played Lord Krishna On T.V

टी.व्ही.वर भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेत नितीशला जेवढी लोकप्रियता मिळाली तेवढी कोणाला मिळाली नाही. बी.आर.चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मधून कृष्णाची भूमिका साकारून तो घरोघरी प्रसिद्ध झाला. चोप्रा यांच्याच ‘विष्णु पुराण’ मालिकेमध्ये, नितीश भगवान विष्णू आणि त्याच्या अनेक अवतारांमध्येही दिसला, परंतु त्याला कृष्णाच्या रूपाने मिळालेली लोकप्रियता इतर अवतारांमध्ये मिळाली नाही. लोक आज त्याला फक्त श्री कृष्णाच्या भूमिकेमुळे ओळखतात आणि आजही त्याचे फॅन फॉलोइंग सोशल मीडियावर खूप चांगले आहे.

स्वप्निल जोशी

Janmashtami , Actors Who Played Lord Krishna On T.V

स्वप्नील जोशीने रामानंद सागर यांच्या ‘कृष्णा’ या लोकप्रिय मालिकेत बाल कृष्णाची भूमिका साकारली होती. त्यावेळी स्वप्नील फक्त १३ वर्षांचा होता. त्याचा निरागस चेहरा पाहून रामानंद यांनी त्याला भूमिकेसाठी निवडले. सुमारे ३ वर्षे त्याने हे पात्र अतिशय सहजतेने साकारले. या भूमिकेमुळे तो इतका लोकप्रिय झाला की लोक त्याला खरा देव मानून त्याची पूजा करू लागले. कृष्णाच्या भूमिकेपूर्वी स्वप्नीलने १९८६ मध्ये रामानंद सागर निर्मित प्रसिद्ध मालिका ‘लव कुश’ मध्येही कुशची भूमिका साकारली होती. दोन्ही भूमिकांनी त्याला खूप लोकप्रियता मिळवून दिली.

सौरभ राज जैन

Janmashtami , Actors Who Played Lord Krishna On T.V

सौरभ राज जैन हा नवीन पिढीतील सर्वात तेजस्वी श्रीकृष्ण साकारण्यासाठी ओळखला जातो. सौरभने ‘उतरन’, ‘पटियाला बेब्स’ आणि ‘चंद्रगुप्त मौर्य’ सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. सौरभ टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा आहे, पण २०१३ मध्ये ‘महाभारत’ मध्ये साकारलेल्या कृष्णाच्या पात्रापासून खऱ्या अर्थाने त्याला लोकप्रियता मिळाली. तो स्वतः म्हणतो की, श्रीकृष्णाची भूमिका ही त्याच्यासाठी नशीब बदलणारी होती. सौरभने केवळ भगवान श्रीकृष्णच नव्हे तर भगवान शिव यांचीही भूमिका साकारली आहे.

मृणाल जैन

Janmashtami , Actors Who Played Lord Krishna On T.V

मृणालने आपल्या कारकिर्दीची सुरुवात भगवान कृष्णाच्या भूमिकेतूनच केली. ‘कहानी हमारे महाभारत की’ या शोमध्ये त्याने साकारलेली भगवान कृष्णाची भूमिका लोकांना आवडली. आशयावरील वादामुळे हा शो सहा महिन्यांत बंद झाला असला, तरी मृणाल जैनला कृष्णा म्हणून लोक आजही विसरले नाहीत. मात्र, यानंतर मृणालने अनेक शोमध्ये अनेक संस्मरणीय पात्रे साकारली आहेत.

विशाल करवाल

विशाल करवालने एकच नव्हे तर तब्बल तीन मालिकांमध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारली आणि कृष्ण म्हणूनच तो प्रसिद्ध झाला. या तीन मालिका होत्या -‘द्वारकाधिश – भगवान श्री कृष्ण’, ‘नागार्जुन – एक योद्धा’ आणि ‘परमावतार श्री कृष्ण’. याशिवाय, विशाल ‘एमटीव्ही रोडीज’ आणि ‘एमटीव्ही स्प्लिट्सविला’ यांसारख्या रिअॅलिटी शोचा स्पर्धक राहिला आहे.

सुमेध मुधगलकर

Janmashtami , Actors Who Played Lord Krishna On T.V

सुमेध मुधगळकर हे टेलिव्हिजनच्या दुनियेतील एक सुप्रसिद्ध नाव आहे. सुमेधने चॅनल व्हीच्या ‘दिल दोस्ती डान्स’ या शोद्वारे अभिनयक्षेत्रामध्ये पदार्पण केले. त्याने अनेक पौराणिक पात्रे साकारली आहेत. परंतु आजही तो टीव्ही वरील ‘राधे-कृष्णा’ मालिकेमधील श्री कृष्णाच्या भूमिकेसाठी ओळखला जातो. लोकांना ही मालिका खूप आवडली. या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका करून, सुमेधने तरुण वयात स्वतःची मोठी ओळख निर्माण केली होती.