जान्हवी कपूर आपले बाबा बोनी कपूर यांच्याशी साफ ...

जान्हवी कपूर आपले बाबा बोनी कपूर यांच्याशी साफ खोटं बोलली होती, कशाबद्दल ते वाचा (Janhvi Kapoor Told Papa Boney Kapoor Such A Big Lie, You Will Be Surprised To Know)

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर हिच्याकडे अभिनयगुण आहेत आणि सुंदर रुप पण आहे. त्यामुळे तिला चित्रपट मिळत आहेत. मात्र ती मागे एकदा आपले बाबा बोनी कपूर यांच्याशी साफ खोटं बोलली होती. या गोष्टीची कबुली जान्हवीने स्वतःहून दिली आहे.

आपल्या घरच्यांशी तू कधी खोटं बोलली आहेस का, असा प्रश्न जान्हवीला एका मुलाखतीत विचारला गेला होता. तेव्हा तिने जाहीर कबुली दिली की, मी बाबांशी खूप खोटं बोलली होती. झालं असं की, मला सिनेमाला जायचं आहे, असं जान्हवीने त्यांना सांगितलं. त्यांनी परवानगी दिली. पण ती पठ्ठी सिनेमाला न जाता, एकटीच लास वेगासचा फेरफटका मारायला गेली. दिवसभर तिथे हिंडली. अन्‌ दुसऱ्या दिवशी विमानाने मुंबईस परतली. हे तिच्या घरच्यांना समजलंच नाही.

मुंबईत जन्म घेतलेल्या जान्हवीचे सुरुवातीचे शिक्षण धीरूबाई अंबानी स्कूलमध्ये झालं. मग तिचा कल अभिनयक्षेत्राकडे वळला. तेव्हा ती कॅलिफोर्नियात गेली. तिथे स्ट्रेसबर्ग थिएटर ॲन्ड फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये तिने अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. अन्‌ मुंबईला परतून चित्रसृष्टीत आपलं नशीब आजमावू लागली.

‘धडक’ या चित्रपटापासून जान्हवीची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. पदार्पणातच आपण सक्षम अभिनेत्री असल्याचं तिनं सिद्ध केलं. या पदार्पणात लक्षवेधी अभिनेत्री म्हणून तिला बक्षीस मिळालं होतं. यानंतर तिला चित्रपट मिळत गेले.

जान्हवीची आई श्रीदेवीला वाटत होतं की तिने डॉक्टर व्हावं. पण जान्हवीला अभिनयाची गोडी लागली होती. श्रीदेवी लाडाने तिला ‘लब्बू’ असे म्हणायची. आता लब्बू हे जान्हवीचं टोपण नाव पडलं आहे.

‘मिली, बवाल, मिस्टर ॲन्ड मिसेस माही’, हे जान्हवीचे आगामी चित्रपट आहेत.

(सर्व फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)