जान्हवी कपूर ने मालदीवमध्ये केले बिकिनी फोटोशूट...

जान्हवी कपूर ने मालदीवमध्ये केले बिकिनी फोटोशूट, बोंबाबोंब होऊ नये म्हणून दिली सफाई (Janhvi Kapoor Sizzles In Silver Bikini From Her Latest Bikini Pictures From Maldives; Actress Clarifies It Was Pre-Lockdown)

देशभर करोनाच्या संकटामुळे माणसांना एकेक श्वासासाठी लढावं लागत आहे. या लढाईमध्ये अनेक कलाकार मंडळी जमेल ती मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. यापूर्वी आपण अनेक सेलिब्रेटींनी गोवा, मालदीव येथील समुद्रकिनारी जाऊन सुट्टीची मजा लुटतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो पाहिल्यानंतर, देशाची अतिशय दयनीय अवस्था असताना कलाकारांनी अशा प्रकारचे फोटो शेअर करणे अशोभनीय आहे, ह्या शब्दात इतर कलाकारांनी त्यांची चांगलीच शाळा घेतली.

त्यानंतर मालदीव सरकारने भारतीय प्रवाशांना तेथे येण्यास बंदी घातली. असे असतानाही जान्हवी कपूरने आपल्या इन्स्टाग्रामवर मालदीव येथील बिकिनी फोटोज्‌ शेअर केले आहेत, ज्यात ती सिल्व्हर कलरच्या बिकिनीमध्ये एका मॅगेझीनच्या कव्हरसाठी पोझ देताना दिसत आहे. ट्रॅव्हल मॅगझीनसाठी करण्यात आलेल्या या फोटोशूटमध्ये जान्हवी सुंदर दिसत असली तरी हे फोटो पाहिल्यानंतर कुठेही बोंबाबोंब होऊ नये यासाठी तिने या फोटोंना प्री कमिटेड पोस्ट अशी कॅप्शन दिली आहे. एवढंच नाही तर, हे लॉकडाऊनच्या आधी केलेलं शूट आहे. आम्ही पूर्णतः सुरक्षित आहोत. तुम्ही सर्व देखील सुरक्षित आणि स्ट्राँग असणार, अशी आशा आहे. असे सांगत तिने सारवासारव केली आहे.

देशात एवढी गंभीर परिस्थिती असताना कलाकारांना सुट्टीची मजा लूटताना पाहून आधीच चाहते नाराज आहेत. अशात आपले हे फोटो पाहिल्यानंतर आपल्यावरही त्यांचा रोष ओढावेल या भितीने जान्हवीने आधीच फोटोशुट मागील कारण स्पष्ट केलं आहे. आपण तेथे कामानिमित्त गेलो असल्याचे तिने आपल्या सफाईमध्ये सांगितले आहे.

तुम्हीही पाहा जान्हवीचे व्हायरल होत असलेले हे नवे-कोरे फोटो!

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम/अँड्रिलामित्रा

वेगवेगळ्या बिकिनी आणि मोनोकिनीमधील जान्हवीच्या या फोटोंनी आणि लूकला चाहत्यांनी पसंती दर्शविली आहे.