जान्हवी कपूरने मालदीव येथून पाठवले, बिकिनीतले ध...

जान्हवी कपूरने मालदीव येथून पाठवले, बिकिनीतले धुंद करणारे फोटो (Janhvi Kapoor Shares Photos In Bikini From Maldives)

रुही, हा हॉरर चित्रपट प्रदर्शित झाल्यावर जान्हवी कपूरने कामाचा शीण उतरविण्यासाठी सरळ मालदीव गाठले. सोबत तिने आपली फिटनेस ट्रेनर नम्रता पुरोहितला पण नेले. मालदीव, येथील समुद्रकिनारे म्हणजे बिकिनी घालून बागडणे आलेच. ते उद्योग या दोघींनी मनसोक्त केले. अन्‌ बिकिनीतील धुंद करणारे फोटो जान्हवीने सोशल मीडियावर शेअर करून, चाहत्यांनाही आपल्या ग्लॅमरचे दर्शन घडविले.

या फोटोंमध्ये जान्हवी, आपली मैत्रिण आणि फिटनेस ट्रेनर नम्रता हिच्यासोबत सूर्यस्नान करतेय्‌, व्हिटॅमिन डी मिळवतेय्‌.

क्रोशिए क्रॉप टॉप आणि हाय वेस्टेड डेनिम शॉर्टस्‌ घालून, या फोटोंमध्ये जान्हवी आणि नम्रता खूपच मस्त दिसत आहेत.

या फोटोंमध्ये जान्हवी आपलं निरागस, सुंदर हास्य दाखवते आहे. तिनं रेड ॲन्ड व्हाईट क्रोशिए टॉप घातलाय्‌, तर नम्रताने येलो ॲन्ड व्हाईट टॉप घातलाय्‌.

या टॉप्सच्या खाली दोघींनी डेनिम शॉर्टस्‌ घातले आहेत आणि सूर्यस्नान घेताना दिसत आहेत. हेअरस्टाईल बघाल तर जान्हवीने पोनीटेल केले आहे नि नम्रताने आपले सुंदर केस मोकळे सोडले आहेत.

या महिन्याच्या सुरूवातीपासूनच जान्हवी मालदीवला रवाना झाली होती.

उघडी पाठ व उघडा गळा दाखविणारी बिकिनी घालून जान्हवीने पाठविलेले हे काही फोटो आहेत –

जान्हवीचे आगामी चित्रपट म्हणाल तर, गुड लक जेरी हा तिचा चित्रपट येईल.

शिवाय ती दोस्ताना – २ आणि करण जोहरच्या तख्त या चित्रपटात दिसेल.