जान्हवी कपूरला रणवीर सिंह सोबत काम करणे पटत नव्...

जान्हवी कपूरला रणवीर सिंह सोबत काम करणे पटत नव्हते म्हणून तिने ‘सिंबा’ चित्रपट नाकारला : जाणून घ्या, नेमकं कारण काय होतं? (Janhvi Kapoor Rejected ‘Simba’ Opposite Ranveer Singh : You Will Be Stunned To Know The Reason)

जान्हवी कपूरने कमी वेळात बॉलिवूडमध्ये खास स्थान मिळवलं आहे. काही चित्रपटातून तिनं आपलं अभिनय कौशल्य आणि सौंदर्याची छाप पाडली आहे. आता ती ‘मिली’ या येऊ घातलेल्या चित्रपटाने चर्चेत आहे. पण तिनं मागे ‘सिंबा’ या चित्रपटात काम करायला नकार दिला होता. कारण काय ते जाणून घेऊया.

काही दिवसांपूर्वी खुद्द जान्हवीनेच एका मुलाखतीत सांगितलं होत की, रोहित शेट्टीने तिला ‘सिंबा’ साठी विचारणा केली होती. पण त्यात तिच्या दृष्टीने मोठा असलेला स्टार रणवीर सिंह नायक होता. त्याच्यासोबत काम करायला तिला मोकळेपणा वाटत नव्हता. म्हणून तिनं साफ नकार दिला.

जान्हवीने नकार दिल्यावर ती भूमिका सारा अली खानला देण्यात आली.

‘सिंबा’ प्रमाणेच जान्हवीने दाक्षिणात्य स्टार महेश बाबू याच्यासोबत काम करायला पण नकार दिलेला आहे. ‘धडक’ या चित्रपटाआधी तिला ही ऑफर मिळाली होती.

जान्हवी डान्स करण्यात निपुण आहे. ‘धडक’ करण्याआधी तिनं कित्येक महिने कथ्थक नृत्याची तालीम केली होती.

कमी वेळात जान्हवीने बऱ्यापैकी पैसे आणि प्रसिद्धी मिळवली आहे. आज तिची एकूण मालमत्ता ५८ कोटी रुपये आहे.

(सर्व फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)