सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन जान्हवी कपूर भरते...

सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन जान्हवी कपूर भरते आपला EMI,अभिनेत्रीने केला खुलासा (Janhvi Kapoor Pays Her EMI By Posting Pictures On Social Media, The Actress Herself Revealed)

बॉलिवूड इंडस्ट्रीतील अभिनेत्री जान्हवी कपूरची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत आहे. नुकताच तिचा ‘मिली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. जान्हवी कपूरच्या दमदार अभिनयाचे सर्वजण कौतुक करत आहेत. चित्रपटांसोबतच जान्हवी सोशल मीडियावरही सक्रिय असते. सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. तिथे ती वेगवेगळे कपडे घालून फोटो पोस्ट करत असते. पण त्या फोटो पोस्ट करण्यापाठी सुद्धा एक कारण आहे. याचा खुलासा स्वतः जान्हवीने केला आहे.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, जान्हवी कपूरने सोशल मीडियावर सक्रियता दाखवून ती ब्रँड कसे मिळवते आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून आपला EMI भरते ते सांगितले.

जान्हवी म्हणाली की, हे फोटो पोस्ट केल्यानंतर, ब्रँड्स माझी दखल घेतात आणि त्यानंतर माझ्याशी संपर्क साधतात. अभिनेत्री स्वतः म्हणाली, “मला अशा गोष्टी सांगण्यात आल्या आहेत की “जर तुमचे चित्रपट आणि तुमचा सोशल मीडिया गेटअप वेगळा असेल तर ते खूप विरोधाभासी होईल. जर ते ब्रॅंडधारक तुम्हाला साध्या गेटअपमध्ये पाहत राहतील तर तुम्ही करत असलेल्या पात्रांना कोण खरेदी करणार नाही. “याशिवाय जान्हवीने आपल्या सोशल मीडिया वापराचा उद्देश मजा करणे हा असल्याचे सांगितले. ती म्हणाली “मी सोशल मीडियावर मौजमजेसाठी येते.”

जान्हवी म्हणाली, “आशा आहे की, जर मी चांगली दिसते आणि आणखी पाच लोकांना माझे फोटो आवडले, तर मला आणखी एक ब्रँड मिळेल आणि मी माझा ईएमआय पूर्वीपेक्षा अधिक सहजपणे भरू शकेन.” जान्हवी कपूरचे हे वक्तव्य लोकांमध्ये सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

जान्हवी कपूरच्या चित्रपटांबद्दल सांगायचे तर नुकताच तिचा ‘मिली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, या चित्रपटातील जान्हवीच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नसला तरी जान्हवीकडे आगामी काळात अनेक चित्रपट आहेत. प्रत्येक चित्रपटात ती वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.