जान्हवी कपूरने आपल्या पदार्पणाबाबत केला आश्चर्य...

जान्हवी कपूरने आपल्या पदार्पणाबाबत केला आश्चर्यकारक खुलासा (Janhvi Kapoor Made a Shocking Disclosure About Her Acting Debut, Told How She Got Her First Break)

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर आज लाखो तरुणांच्या मनावर राज्य करत आहे. ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या जान्हवीने फार कमी कालावधीत इंडस्ट्रीत वेगळे स्थान मिळवले. नुकत्याच एका मुलाखतीत जान्हवीने आपल्या अभिनयातील पदार्पणाबद्दल धक्कादायक खुलासा केला.

मुलाखतीत जान्हवी कपूरने कबूल केले की तिच्या फिल्म इंडस्ट्रीतील ओळखींमुळे तिला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळाला. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, तिच्या पहिल्या दोन चित्रपटांनंतर तिला चांगल्या ऑफर्स मिळू लागल्या. निर्मात्यांनी तिचे काम पाहूनच तिला ऑफर्स दिल्या असे ती म्हणाली.

जान्हवीने सांगितले की, मी स्वत:ला चित्रपटात कास्ट करण्यासाठी पैसे देऊ शकत नाही. जर इंडस्ट्रीत काम मिळत असेल तर ते आपल्या टॅलेंटच्या जोरावर मिळते. जान्हवीला मुलाखतीत विचारण्यात आले की पहिल्या दिवसापासून ज्या टिकाकारांमुळे तू त्रस्त झाली होतीस त्यावर तू मात केली का? याचे उत्तर देताना ती म्हणाली की आता मला त्या गोष्टीचा काही फरक पडत नाही.

जान्हवी आपल्या पहिल्या चित्रपटाबाबत म्हणाली की, मी श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी आहे, कदाचित लोकांना याबद्दल खूप उत्सुकता होती, त्यामुळे मला पहिला मोठा ब्रेक मिळाला आणि लोकांची ही उत्सुकता दुसऱ्या चित्रपटापर्यंत वाढली.

आता कोणतेही काम मिळत असेल तर ते स्वत:च्या टॅलेंटच्या आधारे मिळायला हवे. मी लोकांना मला त्यांच्या चित्रपटात कास्ट करण्यासाठी पैसे देते असे नाही. मी श्रीमंत नाही आणि माझे वडील बोनी कपूरही इतके श्रीमंत नाहीत, पण हे खरे आहे की मला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक फिल्म इंडस्ट्रीतील ओळखीमुळे मिळाला.

जान्हवीने 2018 मध्ये ईशान खट्टरसोबत धडक या चित्रपटातून आपल्या अभिनयातील करीअरला सुरुवात केली होती. त्यानंतर जान्हवीने जोया अख्तरच्या एंथोलॉजी घोस्ट स्टोरीज या नेटफ्लिक्सवरच्या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले. याव्यतिरिक्त तिने ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’, ‘रूही’ आणि ‘गुडलक जेरी’यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता लवकरच ती मिस्टर अॅण्ड मिसेस माही या चित्रपटात दिसणार आहे.