रूहीच्या प्रमोशनसाठी जान्हवी कपूरच्या फोटोशूटनी...

रूहीच्या प्रमोशनसाठी जान्हवी कपूरच्या फोटोशूटनी केली कमाल! (Janhvi Kapoor Looks Stunning During Roohi Day 3 Promotion Photo Shoot)

जान्हवी कपूर सध्या आपल्या आगामी ‘रूही’ या चित्रपटामुळे चर्चिली जात आहे. हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित होणार असल्याने त्याचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. आपला चित्रपट प्रमोट करण्याची एकही संधी हे कलाकार सोडत नाहीत. जान्हवी देखील आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रोज आपले ग्लॅमरस फोटो पोस्ट करत आहे. तिचे आत्ताच्या फोटोशूटमधील लूक्स इतके सुंदर आणि ग्लॅमरस आहेत की त्यामुळे ती प्रकाशझोतात आली आहे. तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.
जान्हवीने अलिकडेच रूहीच्या प्रमोशन डेची काही छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यामध्ये ती हाय स्लिट ब्लॅक गाऊन मध्ये दिसत आहे. या ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत असून तिने आपल्या या फोटोला ‘बॅक टू ब्लॅक’ अशी कॅप्शन दिली आहे.

तिने हॅशटॅगमध्ये रूही डे ३ असेही लिहिले आहे. फॅन्स तिचे फोटो पाहून अतिशय खूश झाले आहेत आणि त्यांनी जान्हवीला पॉझिटीव्ह कमेंटस्‌ दिल्या आहेत. जान्हवीच्या या सेक्सी गाऊनमध्ये सिल्व्हर टच आहे. न्यूड मेकअपने तिच्या सौंदर्याला चारचाँद लावले आहेत. मोकळे सोडलेले कुरळे केस सेन्शूअल लूक देत आहेत. या फोटोशूटमध्ये ती सेक्सी लेग्स दाखवताना दिसते आहे. एकंदरच काय तर रूहीच्या प्रमोशनसाठी जान्हवीचं हे फोटोशूट एकदम परफेक्ट आहे आणि जान्हवीसाठी तरी फॅन्स रुही पाहणारच असं म्हणायला हरकत नाही.